Header Ads

जत बाजारपेठेत अशी होणार दुकाने सुरु | नगरपरिषदेची नवी नियमावली |

 


जत शहरातील दुकाने रोटेशन पध्दतीने ठरलेल्या भागातील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.आज ता.18 रोजी सर्व व्यापारी संघटना यांच्या सोबत बैठकीतील झालेली चर्चा

व त्यानुसार त्यांनी जत शहरातील प्रमुख बाजारपेठा सुरु करण्याबाबत निवेदन केले.

महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन या विभागाने दि.15 मेच्या लॉकडाऊनला दि.31 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.लॉकडाऊन कालावधीत जत नगरपरिषद हद्दीतील क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू/

अत्यावश्यक सेवा पुरविणे गरजेचे असल्याने तसेच सर्व व्यापारी संघटना यांचेसोबत बैठकीत

झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील दुकाने,रोटेशन पध्दतीने चालु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बाजारपेठाखालील तक्त्यात नेमून दिलेल्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश देनेत येत आहे. या

भागातील अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या आस्थापना नियमितपणे सुरू

राहतील,असे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

 

दुकानदारांनी रोटेशन पद्धतीने दुकाने खुली करावीत. या काळात नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.

 

अभिजीत हराळे, मुख्याधिकारी

 

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.