Header Ads

कोरोना योध्दा | जत पोलीसांची वैद्यकीय तपासणी | सर्वजण सदृढजत,प्रतिनिधी : जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी विवेक-बसव फाउंडेशनच्या वतीन रवीवारी दुसऱ्यावेळी करण्यात आली. 
सोलापूरातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांनी या तपासणीचे नियोजन केले.

विवेक-बसव फाउंडेशन संस्थापक तथा प्रसिद्ध डॉक्टर शालीवाहन पट्टणशेट्टी यांच्या पथकाने सुमारे दिडशे पोलीस व पोलीस मित्रांची तपासणी केली.

ऑक्सीजन सँच्यूरेशन,थँरमल सेंसर द्वारे तापमानाची तपासणी केली.त्याशिवाय रक्तदाबही तपासण्यात आला.सर्व पोलीसाच्या या तपासणीच्या नोंदीही घेण्यात आल्या आहेत.भविष्यातील खबरदारी म्हणून हे कोरोनाच्या लढाईत योध्दा म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.तपासणीत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृत्ती सदृढ असल्याचे डॉ.पट्टणशेट्टी यांनी सांगितले.

किरकोळ आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना औषध उपचार करण्यात आले.

 

 

जत पोलीसाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 

 


Blogger द्वारे प्रायोजित.