Header Ads

सांगली | दुधेभावी त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन 

 



 सांगली कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी प्रशासनाने कमालीची दक्षता घेतली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातून येणें जाण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दुधेभावी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.कंटेनमेंट झोन भाग असा दुधेभावी - निमजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग, निमज रस्ता - दुधेभावी पाझर तलाव च्या पूर्वेकडील बाजूचा भाग,दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा,नामदेव फोंडे शंकर फोंडे व जाधव वस्ती च्या पश्चिमेकडील 1 ते 4 च्या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र घोषित केले आहे. याआदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी,डॉ.चौधरी यांनी असे आदेश दिले आहेत.


 


 


Blogger द्वारे प्रायोजित.