Header Ads

जत नगरपरिषदेतकडे प्रलंबित असलेला दिव्यांग कल्याण निधी व्याजासह दिव्यांगाना द्यावा : विक्रम ढोणे


जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदने सन २०१२ पासून वाटप न केलेला दिव्यांग कल्याण निधी व्याजासह दिव्यांगाना द्यावा अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी मुख्याधिकारी अभिजित हाराळे यांच्याकडे लेखी निवदनाद्वारे मागणी केली आहे


जत नगरपरिषदेने सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये  वाटप केलेला दिव्यांग कल्याण निधी प्रत्येकी २२०० रुपये याप्रमाणे वाटप करून नगरपरिषद खूप मोठा गाजावाजा करत आहे पण वस्तुस्थिती प्रमाणे  हा दिव्यांग कल्याण निधी चुकीच्या पद्धतीने वाटप करून दिव्यांग बांधवांची दिशाभूल जत नगरपरिषदेने केली आहे सन २०१२ पासून जत नगरपरिषदेचे स्वउत्पन्न किती आणि दिव्यांग कल्याण निधी किती वाटप केला आणि शासन नियमानुसार किती वाटप केले पाहिजे तेही जत नगरपरिषदेने  जाहीर करावे असे खुले आव्हान विक्रम ढोणे यांनी जत नगरपरिषदेला दिले आहे . नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येते आणि  त्यासाठीचा राखीव ठेवलेला निधी शासन नियमानुसार इतरत्र कुठेही खर्च करता येत नाही. असे असतानाही २०१९_२० या कालावधीत १० लाख तरतूद केली आणि प्रत्यक्षात १ लाख ५६ हजार २०० रुपये एवढेच वाटप केले ते सुध्दा शासनाच्या धोरणाला हरताळ फासत असेही ढोणे म्हणाले.


सध्या कोरोनाच्या संकटात दिव्यांग बांधव खूप मोठ्या अडचणीत सापडला असून त्यांना त्यांच्या हक्काचा प्रलंबित असलेला निधी वाटप करून दिव्यांग बांधावाविषयी कृतिशील सहनभुती दाखवावी असेही ढोणे यांनी म्हटले आहे
 शासन निर्णय क्र संकीर्ण २००७ / प्र क्र ४८७१ वित्त ३ दिनांक ५ अाक्टो २०१२ चे परिपत्रक ३% दिव्यांग कल्याण निधी व दिनांक २५ जून २०१८ चे सुधारित ५% दिव्यांग कल्याण निधीच्या सुधारित परिपत्रकाप्रमाणे जत शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा दिव्यांग कल्याण निधी  २०१२ पासून वाटप न केलेला प्रलंबित असलेला तो दिव्यांग कल्याण निधी व्याजासह पंधरा दिवसात दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात यावे ही विनंती अन्यथा जत नगरपरिषद कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी 
असेही युवा नेते विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.