Header Ads

धक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला

  
 जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अंकले येथे मुंबईहून आलेला चारजणापैंकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.


जत तालुक्यातील हा पहिला रुग्ण आहे.मुळ अंकलेचे मात्र मुंबई येथे कामाला असलेले हे चार व्यक्ती बुधवारी चेंम्बूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे समोर आले आहे.तेथून ते अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते.तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना कोरोटांईन केले होते.
दरम्यान,नागज येथून माहिती मिळाल्यानंतर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती.त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते.तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत.
जत तालुक्यात आतापर्यत सर्व यंत्रणा नियत्रंणात ठेवलेल्या यंत्रणेला हा मोठा धक्का बसला आहे.हे चारजण चेंम्बूरहून वाशी पर्यत ट्रँक्सीने,वासी ते फलटण मालवाहतूक ट्रक व फलटण ते नागजपर्यत मालवाहतूक ट्रकने नागजपर्यत आले आहेत.तेथून चालत ते अंकले येथे आले होते.दरम्यान ट्रक्सी चालक,मालवाहतूक ट्रक चालकांचे शोध सुरू आहेत.त्याशिवाय ते अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी केली जात आहे.
दरम्यान शाळेत ठेवलेले अन्य तिघांची तपासणी केली जाणार आहे.त्यांना जत येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या वतीने सागंण्यात आले आहे.
याबाबत माहिती मिळताच अंकले गावाच्या सील करण्यात आल्या आहेत.पोलिस लावण्यात आला आहे.
 

 


Blogger द्वारे प्रायोजित.