| अंकलेमुळे लगतच्या गावात खबरदारी | डोर्ली,हिवरे,बाज,बेंळूखी, डफळापूर लॉकडाऊन |
जत,प्रतिनिधी : अंकलेत कोरोनाचा बाधित रुग्ण सापडल्याने लगतची गावे भितीच्या छायेत आली आहे.त्यामुळे लगतच्या डोर्ली,हिवरे,बाज,बेंळूखी, डफळापूर लॉकडाऊन करण्यात आली आहेत.अंकलेत मुंबईहून आलेला एकजणाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच धर्तीवर लगतच्या गावातही बाहेर गावावरून गेल्या काही दिवसात अनेकजण आले आहेत.आरोग्य विभागाकडून सर्वांच्या नोंदी घेण्याचे सोपस्कर पुर्ण केले आहे.
मात्र पुढची खबरदारी घेतली जात नसल्याचे आरोप आहेत.बाहेरून आलेले गावातील शाळात कोरोटांईन करण्याचे आदेश असतानाही बाहेरून आलेले अनेकजण थेट घरी गेले आहेत.त्यामुळे भविष्यात अंकलेसारखा धोका उद्भवल्यास वावगे वाटू नये.डफळापूर आरोग्य विभागासह स्थानिक ग्रामपंचायतीही गंभीर नसल्याचे आरोप होत आहेत.फक्त लॉकडाऊनने धोका ठळणारा नाही.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना 14 दिवस कोरोटाईंन करणे महत्वपूर्ण आहे.
दरम्यान आम्ही सर्व ग्रामपंचायतीना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.आरोग्य विभागालाही काय खबरदारी घ्यायची याबाबत आदेश दिलेत.तरीही कोन हलगर्जीपणा करत असेलतर कारवाई करण्यात येईल,असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
अंकलेच़्या धर्तीवर खबरदारी म्हणून लगतची गावे अशी बंद करण्यात आली आहेत.