Header Ads

शिंगणापूर | मध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप |

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत व सेव्ह द चिड्रेन एकविरा सोशल फौंडेशन यांच्या वतीने कोरोना काळात अडचणीत असलेल्या कुंटुबियांना जीवनावश्यक वस्तूचे किटचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे.त्यामुळे शिंगणापूर सह परिसरातील अनेक नागरिक, मजूर,शेतमजूरांच्या हाताला काम नाही.त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.अशा काळात सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत म्हणून हे जीवनावश्यक वस्तूचे किट वाटण्यात आल्याचे संरपच आण्णासो पांढरे यांनी सांगितले.त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांना प्रोत्साहन अनुदानाचे चेक,सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.उपसंरपच संदिप पाटील,ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक व्ही.एस.भोसले व कर्मचारी उपस्थित होते.

 

शिंगणापूर ता.जत येथे जीवनावश्यक वस्तूचे किटचे वाटप करताना संरपच आण्णासो पांढरे,उपसंरपच संदिप पाटील आदी,आशा वर्करना प्रोत्साहन अनुदानही वाटप करण्यात आले.

 

Blogger द्वारे प्रायोजित.