Header Ads

जत | शहरातील गर्दी नियंत्रणात | नगरपरिषद,पोलीसांचे नियंत्रण 
 

जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली दुकाने तिसऱ्या लॉकडाऊनमुळे शिथिलता करण्याच्या निर्णयामुळे 4 तारखेला अचानक उघडण्यात आली.त्यातच जनता कर्फ्यूही 3 तारखेला संपल्यानंतर गर्दी उसळली.जत्रेसारखी धोकादायक गर्दी झाल्याने नगरपरिषद,पोलिसांनी सतर्कता बाळगत तातडीने गर्दी हटविली. दुकानदारांना सक्त सुचना देत गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले होते.त्याशिवाय जीवनावश्यक वस्तू व्यक्तिरित शासनाने परवानगी दिलेली दुकाने राहतील अशा सुचनेवरून दुसरा दिवस ता.5 ला शहरातील मुख्य बाजारपेठेतील गर्दी हटली होती.जीवनावश्यक वस्तूसह शेतीसाहित्याची दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यत सुरू ठेवण्याचे नगरपरिषदेने आदेश काढल्याने अखेर गर्दी नियंत्रणात आली.कोरोनाची अद्याप भिती संपल्याने नाही.सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवसाय करा.अन्यथा चुकून कोरोनाचा रुग्ण आढळल्यास सर्व पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल,अशा सुचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.त्यामुळे मगंळवारी सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळत दुकाने सुरू होती.

 

 

जत शहरातील दुकानात अशा पध्दतीने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत होते.

 


Blogger द्वारे प्रायोजित.