Header Ads

दिक्षा अँपमुळे शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन | बसवराज येलगार यांचा विशेष लेख


 





 




जगात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने ई लर्निंग फ्रॉम होमची संकल्पना सुरु केली आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.

या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना दिक्षा अँप किंवा पोर्टलद्वारे शिक्षण घेता येणार आहे. या अँपवर पहिली ते दहावी पर्यंतच सर्व शिक्षण साहित्य या अँपवर उपलब्ध आहेत.त्यामुळे घरातच अभ्यास करण्याचे सरकारने आवाहन केलं आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.अशा परिस्थिती राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहे.तसेच शालेय स्तरावरील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.राज्यातील लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील कालावधीकरिता वाढवण्यात आली आहे. संचारबंदीच्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या प्रवाहात असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आता उपयुक्त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना स्वयंअध्ययन करता येईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यामातील विविध  ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे.या अँपचा वापर करुन विद्यार्थी घरबसल्या अध्ययन सुरु ठेवू शकतात. तसेच पालकही याचा वापर करुन विद्यार्थ्यांना अभ्यास घेऊ शकतात.

 


श्री.बसवराज येलगार

प्राथमिक शिक्षक,गुळवंची




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.