Header Ads

जत | प्रवेश तपासणी नाक्यावर दक्षता घेण्याची गरज


जत,प्रतिनिधी :  जत तालुक्यात परवाना न काढता, वैद्यकीय तपासणी न करता बेकायदा येणाऱ्याची संख्या वाढत आहे. यासाठी मुंबईहून येणारे दूध टैंकर व मालवाहू ट्रकचा वापर केला जात आहे. प्रमाख्याने पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगतच्या तालुक्यातील उमदी, गिरगाव, बालगाव, हळ्ळी, तिकोंडी, कोतेबोबलाद या सीमा भागातून हे प्रकार जादा घडत आहेत.चेकपोस्टच्यामाध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची, व्यक्तींची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.उमदी ठाण्याअंतर्गत उमदी,चडचण फाटा,

 
तिकोंडी,को. बोबलाद, तसेच जत पोलिस ठाणे अंतर्गत गुहागर-चिपळूण,जत-विजापूर राष्ट्रीय महामार्ग, जत-शेगाव राष्ट्रीय महामार्ग, जत-विजापूर रस्ता, जत-डफळापूर रस्ता,जत-बिळूर रस्ता,जत-मंगळवेढा या रस्त्यावर एकूण आठ ठिकाणी चेकपोस्ट सुरू आहेत. वाहतूक व येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली जात आहे. ग्रामसुरक्षा दल निर्माण करून गावात जागोजागी चेक पोस्ट केली आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.