Header Ads

अंकलेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा सहकारीही कोरोना पॉझिटिव्ह : अंकलेतील रुग्ण संख्या दोनवर


सांगली : अंकले ता.जत येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मित्रही कोरोना बाधित झाला आहे.त्यांच्यासह सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोणा बाधित रुग्ण झाले आहेत.मिरज होळीकट्टा येथील 68 वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील 40 वर्षीय महिला यांचा यात समावेश आहे.
 अंकले ता.जत येथील गेल्या आठवड्यात मुुंबईहून आलेला एकजण कोरोना पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन पैंकी एका सहकारी कोरोना बाधित झाल्याचे चाचणीत समोर आले आहे.त्यामुळे अंकलेतील कोरोना पॉझिटिव्हची संख्या दोनवर पोहचली आहे.कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे.या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


Blogger द्वारे प्रायोजित.