डफळापूर | सिंचन योजनेचा जत तालुक्यातील खलाटी येथील पंपगृह टप्पा क्र.6 (ब) च्या मोटारी आज आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आल्या,त्यातून पाणी बिळूरकडे रवाना झाले.यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी,स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
जत तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या या देवनाळ कालव्यातून गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सोडण्यात येत आहे.ते अंकले,बाज,बेंळूखी,डफळापूर मार्गे खलाटी पंपहाऊसमधून बिळूरकडे रवाना करण्यात आले आहे.दरम्यान मिरवाड तलावाचीही पाहणी आ.सांवत यांनी केली.तेथे अपेक्षित पाणी न आल्याने आणखीन पाच दिवस पाणी सोडण्यात येणार आहे.यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,प.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,विजय चव्हाण, राजकुमार भोसले व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी डफळापूर, बिळूर परिसरातील शेतकऱ्यांशी आ.सांवत यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.