Header Ads

जत | विवेक-बसव प्रतिष्ठानच्या वतीने मास्कचे वाटप |

 


जत,प्रतिनिधी : जत येथील विवेक-बसव प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील इंदिरानगर मधील रहिवाशांना मास्कचे वाटप करण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी यांनी यावेळी कोविड-19 च्या विषाणू पासून स्व:ताचे संरक्षण कसे करावे,
 

हे सांगताना ते म्हणाले,बाहेरून आल्यानंतर प्रथम हातपाय,तोंड स्वच्छ सँनिटायझर किंवा साबनाने धुवावेत.बाहेर जाताना मास्कचा वापर करावा.त्याशिवाय घराबाहेर काम करत असताना 1 मीटरच डिस्टन्सिंगचा नियम पाळणे,अत्यंत महत्वाचे आहे.जेणेकरून कोण शिंकला,अथवा खोकण्यासून संरक्षण होईल.या परिसरातील अनेक कामगार बाहेर काम करत आहेत. त्यांना मार्गदर्शन केले.वारणा दुध संकलन केंद्रातही मास्कचे वाटप केले.यावेळी केंद्राचे सुपरवायझर सुभाष सोनार,प्रतिष्ठानचे सदस्य अँड.रमेश मुंडेचा,सुभाष पवार,सुभाष कोरी,माधव पाठक,शहाजन कलादगी व मयुरेश हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

 

विवेक-बसव प्रतिष्ठानच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.