जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या विषाणूला रोकायचे असेलतर एन 95 मास्क वापरणे गरजेचे आहे.साधारण मास्कमुळे संसर्गाचा धोका आहे.त्यामुळे साधारण मास्क वापरताना दोन मास्क वापरा,दोन्हीच्या आतमध्ये टिशूपेपर टाका,त्यानंतर ते सुरक्षित होतील,अशी माहिती प्रसिद्ध डॉक्टर रविंद्र आरळी यांनी दिली.
जत शहरातील पत्रकारांना फेस सील्डचे वाटप केले.त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.रविंद्र आरळी बोलत होते.यावेळी सर्व पत्रकारांची ऑक्सीजन सँच्यूरेशन,थँरमल सेंसर द्वारे तापमानाची तपासणी केली.त्याशिवाय कोणते मास्क सुरक्षित आहेत यांचे प्रात्याक्षिक करून दाखविले.
यावेळी भाजपचे जेष्ठ शिवाजी ताड,चंद्रकात गुड्डोडगी उपस्थित होते.
डॉ.आरळी पुढे म्हणाले,लोंकाच्या मिसळत असताना आपल्या शरिरावरच्या डोळे,डोक्यावरून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.त्यामुळे डोक्यावर टोपी वापरा,तोंडाला फेस सील्ड कायम वापरत रहा.कोरोनाच्या काळात सुरक्षात्मक बचाव महत्वाचा आहे.रात्री झोपताना,सकाळी गरम पाणी पिणे, मिठ्याच्या गुळण्या घेत रहा,ते कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यास प्रभावी ठरत आहेत.
पाच बाबीवर तपासणी
ऑक्सीजन सँच्यूरेशन,थँरमल सेंसरद्वारे तापमानाची तपासणी,ट्रँव्हस हिट्री,सी रिलेट्रिव्ह प्रोटीन, घशामध्ये काही इनफेक्शन आहे का या माहितीच्या आधारे आम्ही कोरोनाची तपासणी करत आहोत.
डॉ.रविंद्र आरळी,जेष्ठ स्ञीरोग तज्ञ