Header Ads

डफळापूर | कोरोना योध्दा नानासो कोरेंना शहीद घोषित करा | शिक्षक संघटनाची मागणी :






विनाअट, तात्काळ त्यांच्या पत्नीला नोकरी द्यावी

 

जत तालुक्यातील डफळापूर येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर चेकपोस्ट येथे ड्यूटीवर असलेल्या कोरोना योध्दा नानासो कोरे यांना शहीद घोषित करावे,शासनाकडून त्यांच्या कुंटुबियांना 1 कोटी रूपये मदत द्यावी,  त्यांच्या पत्नीला विनाअट तात्काळ नोकरी द्यावी अशी मागणी शिक्षक भारती,शिक्षक समिती,शिक्षक संघ,

अजिंक्यतारा शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

मंगळवार ता.12 रोजी शिंगणापूर चेकपोस्टवर ड्यूटी बजावत असलेले शिक्षक नानासो कोरे हे चेकपोस्टवरून संशयास्पद पळवून नेहलेल्या ट्रकचा पाटलाग करत असताना ट्रक चालकांने त्यांच्या अंगावर ट्रक घालतल्याने दुर्देव्यी अंत झाल्याची घटना घडली होती.कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असलेल्या या योध्दा शिक्षकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार कोरोना योध्दा अर्थात शहीद घोषित करून त्यांना शासनाने श्रंध्दाजली वाहवी,अशी मागणी अजिंक्यतारा

प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सांवत,शिक्षक समितीचे शशिंकात बजबळे,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे,दयानंद मोरे यांनी केली.यावेळी राज्यातील सर्व शिक्षक संघटनाकडून आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे अशा मागण्याचे केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 




अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठाचे अँड.प्रभाकर जाधव म्हणाले,नानासो कोरे हे शिक्षक कोरोनाच्या तपासणीत योध्दा म्हणून काम करत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे कोरोनातील योध्दा (सैनिक)समजून त्यांना शहिद घोषित करावे,व त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारणाऱ्या चालकाला अतिरेकी घोषित करून 302,302अ,121,124अ नुसार गुन्हा दाखल करावा,जेणेकरून यापुढे अशा स्वंयसेवकावर हल्ला करण्याचे धाडस कोन करणार नाही.

शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत म्हणाले, आमचे सहकार्य नानासो कोरे यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सरकारने त्यांच्या कुंटुबियांना 1 कोटीची मदत,त्यांच्या पत्नीला तात्काळ नोकरी द्यावी.

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, कोरोना ड्युटीवर घेताना शिक्षकांना प्रशासनाने कोणतेही प्रशिक्षण न दिल्याने कोरेंच्या बाबतीत ही घटना घडली आहे.शासनाकडे आम्ही त्यांच्या कुंटुबियांना 1 कोटीची मदत,त्यांच्या पत्नीस जिल्हा परिषदेने कोणत्याही अटी न लावता नोकरी द्यावी,अशी मागणी केली आहे.यासाठी आम्ही सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने राज्य,केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.

प्राथमिक शिक्षक समितीचे नेते शंशिकात बजबळे म्हणाले,शिक्षकांना नेमलेल्या पथकात खरेतर गाड्या अडविण़्याचे काम पोलीसांनी करण्याची गरज असतानाही कोरे यांना हे काम करावे लागल्याने त्यांचा दुर्देवी अंत झाला आहे.त्यांना शासनाने जास्तीत जास्त मदत करावी.

शिक्षक संघाचे नेते दयानंद मोरे म्हणाले,प्रामाणिक शिक्षकांवर ही दुर्देवी घटना ओढावली आहे.त्यांच्या कुंटुबियांना खरा आधार देण्याची गरज आहे.शासनाने या शिक्षकांच्या कुंटुबियांना आर्थिक मदत,पत्नीस तात्काळ नोकरी देऊन न्याय द्यावा.यावेळी शिक्षक संघटनाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.