Header Ads

जत | पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग सुरु-प्राचार्य डॉ.होसकोटी* 


सोन्याळ,वार्ताहर :सां जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ.रमेश होसकोटी यांनी केले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे  विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत.विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.त्यानुसार सांगली जिल्ह्यासाठी ८  समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे  जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक खालील समुपदेशकांची संपर्क साधू शकतात.


महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग ,एस.सी. ई.आर. टी. पुणे व डायट सांगली यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांना मोफत ,       निशुल्क मार्गदर्शन व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी , पालक, शिक्षक, मुख्याध्यापक याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये त्यांना करिअर मार्गदर्शन, कल चाचणी मार्गदर्शन, ताण तणाव व्यवस्थापन इत्यादीसारख्या अनेक विषयावर मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग, डायट सांगलीच्या डॉ. वैशाली राजेंद्र भोई यांनी सांगितले.


           


          *चौकटीत*   


*जिल्ह्यातील समुपदेशक नावे*


 १.संभाजी शिंदे दिघंची हायस्कूल , दिघंची
  ९४२८३०९९२५


२.एस. एन. सरक रामराव विद्या मंदिर, जत
       ९७६४६०१७५२


३.सरोज बाबर देशभक्त आरती पाटील विद्या. कुपवाड ९८९०७७७६१२


४.संजय पाटील रा . स. कन्या शाळा, सांगली
         ९७३०८४८०७४


 ५.पांडुरंग गुरव श. सुरेश चव्हाण हायस्कूल, करोली टी.  ९६७३४६९०३१


 ६.विकास कांबळे भारतमाता विद्या.चिकुर्डे  ७७९८८६९०९२


७.रमेश एस. हाल्लोळी जलतरणपटू सागर पाटील विद्या. ढवळी ८९२८७६४२७५


८. ए.जी.भोसले माहात्मा गांधी विद्या. सावळज ९७३०३९८२१६


Blogger द्वारे प्रायोजित.