Header Ads

डफळापूर | घटनेतील शिक्षकांच्या वारसांना 1 कोटीची मदत करा | शिक्षक भारतीची मागणी, तहसीलदारांना निवेदन


 





 

 

 

जत,प्रतिनिधी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर आंतरराज्यीय चेकपोस्ट वर ड्युटी करणारे शिक्षक स्वर्गीय नानासो कोरे यांच्या झालेल्या अपघाती निधन संतापजनक आहे.कोरोनाच्या लढाईत योध्दा म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षकांचा अंत दुख:दायक आहे.त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी व  वारसांना विनाअट शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी,अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.

 




तसीलदार सचिन पाटील यांनी मृत शिक्षक नानासो कोरे यांच्याबाबत शासकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव तयार केलेले आहेत,आज स्वर्गीय नाना कोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन तालुका प्रशासन सर्व प्रकारे मदत असल्याचेही पाटील यांनी सांगितले


चेकपोस्टवरील शिक्षकांना बारा तासा ऐवजी 8 तास ड्यूटी द्यावी.

बाज केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचे पगार अद्यापही शिक्षकांच्या खात्यावर जमा नाहीत,याबाबत माहिती देण्यात आली. तहसीलदार पाटील यांनी बँकेत फोन करत तात्काळ पगार द्यावेत,असे आदेश दिले.

यावेळी शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत,नेते नवनाथ सांगा,जिल्हा उपाध्यक्ष मल्लय्या नंदगाव,तालुका उपाध्यक्ष अविनाश सुतार जितेंद्र बोराडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

 

 

डफळापूर घटनेतील शिक्षकांच्या वारसांना 1 कोटीची मदत करा या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना दिले.


 




 



 






 

 

 







Blogger द्वारे प्रायोजित.