Header Ads

अपघात | संखनजिक अपघात बिळूरचा एकजण जागीच पठार
 

 

 

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे द्राक्ष वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपचा अपघात होऊन एकजण चाकाखाली गेल्याने जागीच ठार झाला.अनिलकुमार शिंवलिंगा मुडेगोळ (वय 30 वर्षे,राहणार बिळूर)असे पठार झालेल्याचे नाव आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक अशी,बिळूर येथील तिघेजण बिळूरहून द्राक्ष आणण्यासाठी पिकअप क्रं.एमएच-04,जीसी 1648 ने भरधाव वेगाने निघाले होते.संखनजिकच्या एस्सार पेट्रोल पंपानजिक चालकाचा ताबा सुटून पिकअप पलटी झाले.त्यात अनिलकुमार मुडेगोळ हा पिकअपमधून थेट चाकाखाली फेकला गेला.पिकअपचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच पठार झाला.अन्य दोघे राजू कलप्पा कायपुरे (वय 30 वर्षे),द्राक्ष व्यापारी राजू चॉदसाब व्हनवाड (वय 36 वर्षे,दोघे रा.बिळूर)हे जखमी झाले आहेत.यात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.उमदी पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

 

 

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.