Header Ads

संख | प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड मास्कचे वाटप 
 

कोरोना विषाणूचा राज्यभर होत असलेला फैलाव या पार्श्वभूमीवर सध्या जत तालुक्यात लॉकडाऊन तिसऱ्या टप्यात आरोग्य विभागाचा कसोटीचा काळ आहे.बाहेरून येणाऱ्या लोकांची मोठी संख्या असणार आहे.त्यामुळे त्यांच्या तपासणीसह कोरोना विषाणुचा संसर्ग वाढू नये यासाठी काम करण्याची मोठी गरज आहे.या काळात संख आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून  पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून(पी.पी.ई.किट),फेस शील्ड मास्कचे वाटप करण्यात आले.

 

संख येथील राजारामबापू पाटील जूनियर कॉलेजचे व्हाईस चेअरमन सुभाष पाटील यांच्याहस्ते हे किट देण्यात आले.या कसोटीच्या काळात कोरोना योध्दा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी काम करत आहेत.त्यांची सुरक्षा जपण्याचे आम्ही आमचे नेते नामदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून केले असल्याचे सुभाष पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संख प्राथमिक वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत बुरकुले, डॉ.स्नेहल सावंत व प्रा.आ.केद्रांचे कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ.शिवगोंडा पाटील,डॉ.आर.बी.पाटील,डॉ.संभाजी जाधव,डॉ.रेवनसिद्ध कनुरे,

डॉ.दयानंद वाघोली, डॉ.सतीश येळदरी,जत बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिराजदार,मलिकार्जुन सांयगाव, सदाशिव बिराजदार उपस्थित होते.

 

 

संख प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचाऱ्या फेस मास्क सील्डचे वाटप करताना सुभाष पाटील व मान्यवर
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.