Header Ads

कंठी | विहिरीत पडलेल्या कोल्हाला वन विभागाच्या पथकाने दिले जीवदान |जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथे कुञ्याच्या हल्ल्यापासून बचाव करत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांने जीवदान दिले.

रवीवारी रात्री हा सुमारे दोन वर्षे वयाचा  कोल्हा कंठी नजिकच्या कँटल फार्मच्या सरकारी विहिरीत पडला होता.वनविभागाला यांची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी एस.के.गुगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्री नरूटे,वन मजूर संकपाळ अन्य मजूरांनी विहिरीतून या कोल्ह्याला बाहेर काढत नैसर्गिक सानिध्यात सोडण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.