कोरोना योध्दा : आशा वर्करना प्रकाश जमदाडे यांच्याकडून हँन्डग्लोजजत,प्रतिनिधी : कोरोनाच्या लढाईत जत तालुक्यातील सुमारे साडेतीनशे गटप्रवर्तक, आशा वर्कर कोरोना योध्दा सारख्या काम करत आहेत.त्यांची सुरक्षा महत्वाची असल्याने सर्वांना हँन्डग्लोज देऊन त्यांच्या कार्याला बळकटी देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केला.

जत तालुक्यातील आशा गट प्रवर्तक,आशा वर्कर यांना श्री जमदाडे यांच्याकडून हँन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.

श्री.जमदाडे म्हणाले,सध्या कोरोनाच्या तपासणीत या आशा पुढे असतात.त्या आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.त्यांच्या सुरक्षेबाबत सरकार म्हणावे तसे गंभीर नाही.आशा वर्कर संघटनेच्या नेत्या मीना कोळी यांनी आम्हच्या तालुक्यातील आशा वर्करसाठी सध्या हँन्डग्लोजची गरज असल्याचे सांगितले होते.त्यानुसार आम्ही हे हँन्डग्लोज दिले आहेत.कोरोना लढाईत या आशा वारियर्सना काम करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल ऐवढे निश्चित.