Header Ads

म्हैसाळ पाणी | आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याकडून देवनाळ कालव्याची पाहणी | शक्य आहे तेथेपर्यत पाणी सोडण्याचे आदेश |


जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागातील देवनाळ कालव्याची पाहणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केली.


या कालव्याद्वारे अंकले,खलाटी पंपहाऊसच्या माध्यमातून अंकले,बाज,बेंळूखी,डफळापूर, खलाटी,बिंळूर परिसरातील ओढापात्रे,बंधारे,तलावात पाणी सोडण्यात येत आहे. मोठ्या क्षमतेने पाणी येत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सध्या बेंळूखी, बाज,परिसरातील बंधारे,तलाव या पाण्याने भरण्यात आले आहेत.पुढे डफळापूर, खलाटी व बिंळूर परिसरात हे पाणी सोडण्यात येणार आहे. शनिवारी आमदार सांवत,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,अरविंद गडदे,संभाजी कदम सर यांनी अंकले,खलाटी पंपहाऊस व कँनॉल परिसरातील तलावाची पाहणी केली.परिसरातील शेतकऱ्यांची संवाद साधत अडचणी समजावून घेतला.यापुढे कशा पध्दतीने व कुठेपर्यत पाणी सोडणे शक्य आहे.यांचीही माहिती आमदार सांवत यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून घेतली.वरिष्ठ अधिकारी अभिमन्यू मासाळ यावेळी उपस्थित होते. येत्या काही दिवसात या परिसरात जाईल तेथेपर्यत पाणी सोडा,असे आदेश अधिकाऱ्यांना आ.सांवत यांनी दिले.


Blogger द्वारे प्रायोजित.