Header Ads

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुंटुबियांना 50 हजाराची मदत


 

 

 

 

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग संखचा अपघात ग्रस्त कर्मचारी राजेश काळे यांच्या कुंटुबियास संख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी जमविलेली पन्नास हजार रुपयाची मदत सुपुर्द केली.

संख येथील विद्युत कर्मचाऱ्याचा अपघाती मुत्यू झाला होता.त्यामुळे त्यांचे कुंटुबिय अडचणीत आले आहे.त्यांना त्याचे सहकारी असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील रक्कम गोळा करून त्याच्या कुंटुबियांना रोख पन्नास हजाराची मदत केली.त्याशिवाय त्यांच्या मुलांच्या एका वर्षाचा शिक्षणाचे खर्चही उचलला आहे.वरिष्ठ अधिकारी प्रविण फडतरे यांच्याहस्ते ही रक्कम काळे यांच्या पत्नीकडे सुपुर्द केली.
आपल्यातील एक कर्मचारी अपघातात मुत्यू पावल्यानंतर संखच्या या कर्मचाऱ्यांनी केलेली ही मदत काळे कुंटुबियांना लाखमोलाची ठरणारी आहे.यावेळी माडग्याळ सेक्शन अधिकारी श्री.कुंभार,संख उपविभागाचे फोरमँन के.बी.माळेकर,देवानंद पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना वरिष्ठ अधिकारी फडतरे म्हणाले,माणसांनी माणसाला मदत करावी,या उद्देशाने आमच्या सहकारी असणारे काळे कुंटुबियांवर कोसळलेल्या संकटात हि मदत केली आहे.त्यांच्या कुंटुबियांना यामुळे काही प्रमाणात मदत मिळणार आहे. आमच्या उपविभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जमा केली होती.

 

 


कर्मचाऱ्यांची मदत आदर्शवत

 

कोरोनाच्या काळातही विद्युत वितरण कंपनीचा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राजेश काळे कुंटुबियांना केलेली मदत कौतुकात्स्पद आहे,यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा,असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले.

 

 

महावितरणच्या संख विभागीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जमविलेले कुंटुबियांना 50 हजाराची मदत देण्यात आली.
 

 


 


 
 

 

 


  Blogger द्वारे प्रायोजित.