Header Ads

महाराष्ट्र | गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी : तम्मणगौंडा रवीपाटील,कामाण्णा बंडगर |


 जत,प्रतिनिधी : भाजपचे नेते तथा संघर्षवादी युवा नेतृत्व गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेवर आमदारपदी संधी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील, युवा नेते कामाण्णा बंडगर यांच्यासह जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राज्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून पडळकर यांची राज्याला ओळख आहे.भाजपचा स्टार चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते.त्यांना माननारा राज्यात मोठा वर्ग आहे.
बारामती सारख्या लोकसभा मतदार संघात त्यांनी तेथील प्रस्तापित राजकारण्यांना हलविले होते.आटपाडी-खानापूर मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या हितासाठी गोपीचंद पडळकर संघर्ष करत आहेत.पडळकरांची आमदारकी राज्यात भाजपला बळकटी देण्यास प्रभावी ठरणार आहे.त्याशिवाय तळागाळापर्यत भाजपाला मजबूत करण्यासाठी पडळकर निश्चित प्रयत्न करतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर विधानसभेच्या मैदानात उतरले असते तर आमदार असे उद्गारही बारामतीतील प्रचार सभेत काढले होते.अशा उमद्या नेत्याला
भाजपने विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी द्यावी अशी मागणी रवीपाटील व बंडगर यांनी केली आहे.यावेळी लिंबाजी माळी, जेटलिंग कोरे,बिराप्पा चौगुले,प्रवीण पाटील,चन्नाप्पा माळी,अविनाश लाड,रामदास गुरव उपस्थित होते.


 


 


Blogger द्वारे प्रायोजित.