Header Ads

सिंगनहळ्ळीत | शाळकरी मुलाची आत्महत्या


 

 
 

जत,प्रतिनिधी : सिंगनहळ्ळी ता.जत येथील शाळकरी विद्यार्थ्यांने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडीस आली.विराज आप्पासो हिप्परकर(वय-15)असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आहे.

घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,सिंगनहळ्ळी येथील एसटीत चालक असलेले आप्पासो हिप्परकर हे एक मुलगी,तीन मुलासह सिंगनहळ्ळी हद्दीतील शेतात राहतात.त्यांच्या नवीन घराचे बांधकामही सुरू आहे.द्वितीय मुलगा विराज हा नवीच्या वर्गातून दहावीच्या वर्गात यावर्षी जाणार आहे.लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसापासून शांळाना सुट्या असल्याने तीन्ही मुले घरीच आहेत.आता लॉकडाऊन उठल्याने आप्पासो हिप्परकर यांनी विराज याला आता शाळा सुरू होणार आहेत.टिव्ही सतत बघू नकोस,व्यायाम कर, अभ्यास चालू कर असे सांगितले होते.वडील जतला कामासाठी आले होते.आई जुन्या घरात घरकाम करत होती.तर बाकीचे भाऊ व आजूबाजूची मुले घरासमोर खेळत होती.दरम्यान वडील ओरडल्याचे मनास वाईट वाटून विराजने नवीन घरात दोरीने गळपास घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घरासमोर खेळणाऱ्या इतर मुलाच्या हा प्रकार लक्षात येताच ते तिकडे धावले.तातडीने विराज याला जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र तत्पुर्वीच त्यांची मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.दरम्यान लॉकडाऊन मुळे शाळकरी मुले दिवसभर टिव्ही खेळण्यात अडकून आहेत.आई-वडीलांनी टिव्ही बघू नको म्हटल्यावर मनास वाईट वाटून घेतात,चिडचिडणे असे घरोघरी घडत आहेत.सिंगनहळीतील या आत्महत्येमुळे हा किती गंभीर प्रकार आहे.हे समोर आले आहे.
 

 


 

 


 


 


Blogger द्वारे प्रायोजित.