Header Ads

जत | वनक्षेत्रात पाणवटे,वन्य प्राण्यासाठी पाण्याची सोय |


जत,प्रतिनिधी : तीव्र पाणा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जत वनविभागाच्या जत, मुंचडी,शेगाव,व्हसपेठ परिसरातील वनक्षेत्रामध्ये पाणवटे तयार करण्यात आले आहेत.त्यात टँकरद्वारे पाणी सोडून वन्य प्राणी व पशूपक्षांची सोय केली आहे.
सध्या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटले आहेत.त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी वनक्षेत्राबाहेर लोकवस्तीत येण्याची शक्यता होती.ते त्यांच्या जीवास धोका करणारे होते.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जत वनविभागाच्या वतीने 
जत,मुंचडी,शेगांव,व्हस्पेठ परिसरातील वनक्षेत्रात वन्यप्राणी,पक्षी इतर जैव विविधता जपण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या तालुक्यातील वनक्षेत्रात तरस,कोल्हे,लांडगे,ससे,रानमांजर,रान डुंकरसह अनेक दुर्मिळ प्राणी,पक्षी राहतात.त्यांची पाण्यासाठी हाल होऊ नये यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवातच पाणवटे तयार करून पाण्याची सोय केली आहे,अशी माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस.के.गुगवाड यांनी दिली.


Blogger द्वारे प्रायोजित.