Header Ads

जत | गर्दीमुळे पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा | 100 टक्के बंदचा फटका : अचानक गर्दी उसळली



जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचा तीसरा टप्पा सुरू झाला.यात अत्यावश्यक सेवेसह काही दुकाने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते.स्थानिक नगरपरिषदा व ग्रामपंचायतीकडून त्याबाबत स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत अशी सुचना दिल्या होत्या.मात्र काही ग्रामपंचायतीकडून वेळेत निर्णय घेतला नाही.परिणामी जत शहरासह डफळापूर, माडग्याळ, संख,उमदीसह अनेक गावात अचानक गर्दी उसळली.परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला.परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पुन्हा पोलीसांना हस्तक्षेप करत गर्दी हटवून दुकाने बंद करावी लागली.

त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

 

बंदचा फटका

 

जत शहरात सलगचा जनता कर्फ्यू,व तालुक्यातील गावे अनेक दिवसापासून पुर्ण वेळ बंद करण्यामुळे आज सोमवारी अचानक गर्दी उसळली.यापुर्वी ग्रामीण भागातील किराणासह शेती साहित्य विक्रीची दुकाने काही तासासाठी सुरू होती.मात्र जत नगरपरिषदेकडून सलग पाच पाच दिवस बंद पाळण्यात आला.काही ग्रामपंचायतीनेही नागरिकांना सुचना न देता शंभर टक्के बंद पाळला. सलगच्या बंदमुळे नागरिकांच्या घरातील किराणा साहित्यासह जीवनावश्यक वस्तू संपल्याने सोमवारी प्रचंड गर्दी झाली.

 

दररोज दुकाने काही तासासाठी सुरु ठेवा

 

100 टक्के बंदपेक्षा काही वेळ दुकाने चालू ठेवण्याची गरज आहे.पुर्ण बंदमुळे सोशल डिस्टन्सिंग होते.मात्र बंदनंतर दुकाने एकदम दुकाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे.परिणामी प्रचंड गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.ग्रामपंचायतीने नियोजन करण्याची गरज आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.