Header Ads

संतापजनक | संखची 108 रुग्णवाहिका दोन महिन्यापासून डॉक्टरविना बंद |


 





 




संख,वार्ताहर : जत तालूक्यातील संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या 108 रुग्णवाहिका डॉक्टर नसल्याने दोन महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे परिसरातील 17 गावातील नागरिकांचा अत्यावश्यक सेवा मिळणे कठीण बनले आहे.कोरोना काळात जत पुर्व भागातील महत्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या या केंद्राची रुग्णवाहिका बंद असणे एकाद्या रुग्णांचा जीवघेणे ठरणारे आहे.परिसरातील अत्यावश्यक 108 टोल फ्री नंबरवर्ती रुग्णांना सेवा देण्यासाठी ही रुग्णवाहिका वापरात होती.मात्र गेल्या दोन महिन्यापासून या रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र डॉक्टर नसल्याने ती बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ह्रदयविकार,अपघात,प्रस्तूतीच्या रुग्णांना खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.

 याबाबत आम्ही वरिष्ठ विभागाला माहिती दिली आहे.सध्या कोरोनाच्या बिकट काळात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज असणे गरजेचे आहे, मात्र रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने ती बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तातडीने या रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र डॉक्टर नेमावा,असे केंद्राचे डॉ.सुशांत बुरकुले यांनी सांगितले.

 

 

 

संख आरोग्य केंद्राची सुसज्ज असलेली 108 रुग्णवाहिका बंद ठेवण्यात आली आहे.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.