Header Ads

संख | तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

 

 


जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संख अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महसूल कर्मचाऱ्यांच्या वर्ती मोठी जबाबदारी आहे.पोलीस पाटील,कोतवाल, तलाठी,अधिकारी या कामात योगदान देत आहेत.बाहेरून आलेले नागरिकांच्या नोंदी,स्वस्त धान्य वितरण,शासकीय जीवनावश्यक वस्तूचे वाटप,सोशल डिस्टन्सिंग,गावातील नागरिकांची कोरोना पासून सुरक्षा या सारखी कामे सध्या हे कर्मचारी करत आहेत.त्यामुळे त्यांचे आरोग्य सदृढ रहावे,यासाठी ही तपासणी करण्यात आली. कार्यालयाकडील सर्व कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठी,कोतवाल,पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.

 




अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संख प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत बुरकुले,डॉ.कोमल चाचे व कर्मचारी यांनी ही आरोग्य तपासणी केली.सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.

 

संख ता.जत येथील अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करताना वैद्यकीय पथक

Blogger द्वारे प्रायोजित.