Header Ads

शेतकऱ्यांचे औजारे घेऊन आंदोलन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार


 

सांगली,प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किसान सन्मान दिनाचे आऊचीत्या साधून इनाम धामणी येथील शेतात हातात औजारे घेवून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन ,जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले हातात औजारे घेवून शेतकऱ्याच्या लढ्याला पाठींबा देण्यात आला.यावेळी मला गर्व आहे,शेतकरी असल्याचा, मी शेतकरी, मी जगाचा पोषिदा, शेतकऱ्यांना कर्जमाफी ,व्याजमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, औजारे, अनुदानावर मिळालीच पाहिजेत, आदी घोषणा देण्यात आल्या




या प्रसंगी खराडे म्हणाले ,सध्या कोरोना चे संकट देशभर आहे या संकटात कोणतेही सुरक्षेचे साधन नस ताना ही बळीराजा उन्हा तन्हात राबून 135 कोटी जनतेला जगविण्या चे काम करत आहेत जगाचा पोशिदा मात्र उपेक्षित आहे ज्या प्रमाणे या युद्धात आरोग्य कर्मचारी वॉरियर्स आहेत त्याच धर्तीवर बळीराजा ला फूड वॉरियर्स म्हणायला हवे या युद्धात बळीराजा जीवावर उदार होवून काम करत आहेत मात्र तरीही बळीराजाला सन्मान दिला जात नाही शेतकरी दुर्लक्षित आहे या बळीराजाला सन्मान मिळाला पाहिजे त्याच्या मागण्यांना प्रतिसाद मिळाला पाहिजे पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले मात्र या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले कोणत्याही ठोस मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत भरीव पॅकेज ची अपेक्षा असतानाही तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग करण्यात आला आहे हिंशेतकर्याची चेष्टा आहे यावेळी प्रा अजित हलीगळें संजय आवटे अमोल पाटील प्रकाश गिरी,निखिल कारंडे राजाराम देसाई, साहेबराव वाघमारे आदी उपस्थित होते

Blogger द्वारे प्रायोजित.