Header Ads

जत | त्या 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जत,प्रतिनिधी : जतच्या सिंगनहळ्ळी पोलीस तपासणी पोस्टवरील ते चार पोलीस कर्मचारी व सात स्वंयसेवकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

या तपासणी पोस्टपासून काही अंतरावरील सांगोला पोलीसांच्या तपासणी पोस्टवरील एक पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळला होता.त्यामुळे जतेत खबरदारी बाळगत तपासणी पोस्टवरील 4 पोलीस व 7 स्वंयसेवकांना जत येथे कोरेनटाईन केले होते.त्याचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचे रिपोर्ट तालुका वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले आहेत.त्या आकरा जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान सांगोला तालुक्यातील सांगोला पोलीसाच्या तपासणी पोस्टवरील एकटा पोलीस कर्मचारी वगळता अन्य पोलीसाचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.दरम्यान घोरपडी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांना जत येथील वस्तीगृहात संस्था कोरोटाईन केले आहे. त्यांचे स्वाब घेऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.