Header Ads

कोरोना | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द ; संजय कांबळे यांची माहिती 


जत,प्रतिनिधी : जगभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी विश्र्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समाजबांधवानी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमीनी आपआपल्या घरातच साजरी करावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे. 

कांबळे म्हणाले की,दरवर्षी आम्ही विश्र्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे वतीने मोठ्या धुमधडाक्याने डाॅ.आंबेडकर जयंती उत्सव साजरा करतो.याप्रसंगी राज्यातील व देशातील ख्यातनाम वकत्यांची भाषणे आठवडाभर ठेवण्यात येत असतात. व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जत शहरातील प्रमुख मार्गावरून मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी जयंती मिरवणूक ही काढली जाते.परंतु यावेळी जागतिक स्तरावर चिनमधिल वुहान या प्रांतातून अल्पावधीतच जगभर लागण झालेल्या कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. जगातील दोनशेहून अधिक देशांना या महामारीने ग्रासले आहेत.आतापर्यंत जगातील सतरा लाखपेक्षा जास्त लोक या महामारीने संक्रमित झाले आहेत.तर एकलाखाहून अधिक लोक या महामारीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

भारत देशात तर या महामारीमुळे जवळपास सातहजार लोक आठ हजार लोक संक्रमित झाले असून 

दोनशेहून अधिक रूग्णांचा यामध्ये बळी गेला आहे.तर या महामारीतून पाचशे चार रूग्ण बरे झाले आहेत.भारतात कोरोना या महामारीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या महामारीचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात एकविस दिवसाचा लाॅक डाऊन जाहीर केला आहे.त्याची मुदत दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी संपते त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सोळाशेच्या जवळपास कोरोनाचे रूग्ण असल्याने महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लाॅक डाऊन चा कालावधी हा आणखी पंधरा दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत लाॅक डाऊन कालावधी मध्येप्रशासनाने गावोगावच्या यात्रा, जत्रा, ऊरूस, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम या बरोबरच सर्व जयंत्या व राजकीय कार्यक्रम पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे कोरोना या महामारी ची लागण आपल्या सांगली जिल्ह्यात पसरू नये यासाठी आम्ही या वेळी दरवर्षी मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी विश्र्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  सार्वजनीक कार्यक्रम रद्द करत असून प्रत्येकानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचशिला, त्रीशरण आदी कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.यावेळी जत नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे, बसपचे जिल्हाध्यक्ष अतुल कांबळे,रिपाईचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील,प्रभाकर सनमडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.


 

   

 
Blogger द्वारे प्रायोजित.