Header Ads

उमदी | परिसराला अवकाळीचा फटका | घरांचे पत्रे उडाले,बेदाण्याचे मोठे नुकसान |


  

बालगाव,वार्ताहर : उमदी,बालगाव,हळ्ळी,

बेळोंडगी परिसरात सोमवारी सायकांळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला.वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले.विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छते उडाले.काही शेतकऱ्यांच्या बेदाणे शेड,बागाचे नुकसान झाले.बालगाव,हळ्ळी येथे वादळी वाऱ्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले.

सायकांळी सहा ते आठच्या दरम्यान वादळाने थैमान घातले.या वादळी वाऱ्यात काही झाडे ही उन्मळून पडली आहेत.

 

 

उमदीसह परिसरातील सर्वच गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून द्राक्षे सह अनेक शेतीमालाचे नुकसान झाल्याने,शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी. 

सोमनिंग बोरामणी

चेअरमन ; सर्व सेवा सोसायटी,बेळोंडगी


 


 

Blogger द्वारे प्रायोजित.