Header Ads

जत | धान्य व्यवस्थित मिळते का ? | आमदार सांवत यांनी साधला संवाद : शहरातील स्वस्तधान्य दुकांनाना अचानक भेटी

 


जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते का, नाही? याची माहिती घेऊन ज्याच्यांकडे शिधापत्रिका आहे परंतु ते दुकानातून धान्य घेत नाही त्यांनी व ज्याच्यांकडे शिधा पत्रिका नाही, अशा गरजूंना धान्य द्यावे असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी यावेळी नागरिकाशी बोलतांना केले. गावात कोणी बाहेरची व्यक्ती कोणाकडे आल्यास तात्काळ प्रशासनास कळवून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या अशा सुचना दिल्या.लॉकडाऊन काळात कार्यकर्त्यांनी व सामाजिक संस्थांनी सर्वसामान्य, गरजू, शेतमजूरांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.जत तालुक्यातील परिस्थितीत नागरिकांना मदत करणे आता महत्वाची आहे.प्रशासन,आम्हीही सतर्क आहोत. 

आ.सांवत यांनी गेल्या आठवड्यात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू नका अशी विनंती आ.सांवत यांनी नागरिकांना करु न लॉकडाऊन काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.रवीवारी सकाळी त्यांनी जत शहरातील स्वस्त धान्य दुकानांना अचानक भेटी दिल्या.उपस्थित नागरिकांशी संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या.सामाजिक अंतर ठेवून गावोगावी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना घरातच रहा,सुरक्षित रहा, विनाकारण घराच्या बाहेर पडु नका, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेलातच तर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा,मास्क वर सॅनिटायझरचा वापर करा, शेतकऱ्यांनी सुध्दा शेतात काही काम करीत असतांना पूरेसे अंतर ठेऊन कामे करा असे आवाहन केले.


आमदार विक्रमसिंह सांवत यांनी जत शहरातील स्वस्तधान्य दुकांनाना अचानक भेटी देत धान्य वाटप केले.

Blogger द्वारे प्रायोजित.