Header Ads

शैक्षणिक | सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद काळातही अध्ययन सुरू | शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार.


सोन्याळ,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर सुरू झाला आहे.त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू आहे. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू आहे.डायट अधिव्याख्याता विषय सहाय्यक ,समावेशिततज्ज्ञ, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांच्या माध्यमातून प्रत्येक  पालकांचे व्हाट्सअप ग्रुप, शिक्षकांचे विविध व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून ही अभ्यासमाला  दररोज पोहोचविण्यात येत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीचा झाला असून याबाबत पालकांनी सकारात्मक प्रतिसाद व समाधान व्यक्त करीत आहे.        लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत जरी येऊ शकत नसले तरीही ते SCEERT  पुणे मार्फत तयार करण्यात आलेल्या दीक्षा ॲप ऑनलाईन अभ्यासमाला व पूर्व प्राथमिक/ बाल शिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी 10.00 वाजता  'गली गली सिम सिम'  हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. या माध्यमातून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी होता येते. दैनंदिन झूम मीटिंग च्या माध्यमातून देखील शिक्षण विभाग व डायट मधील सर्व अधिकारी, विषय सहाय्यक, सर्व  प्रशिक्षित शिक्षक  स्वतः गुणवत्ता विकासात सक्रिय राहून कार्य करीत आहेत. हा अभ्यासमाला उपक्रम  विद्यार्थी, पालक सर्व शिक्षकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.  सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी, शिक्षक ,पालक व विद्यार्थी सजगतेने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून Study From Home हा उपक्रम यशस्वीपणे चालू ठेवले आहेत. याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभारी आहे


               
- डाॅ रमेश होसकोटी
 प्राचार्य डायट सांगली


Blogger द्वारे प्रायोजित.