Header Ads

कोरोना | जनता कर्फ्यू संपला,जतकरांचा उंदड प्रतिसाद | घेरडीत रुग्ण सापडला,जत पुन्हा धोका


 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील चार दिवसाचा जनता कर्फ्यू संपला असला तरी तीन मे पर्यत पूर्वीप्रमाणे लॉक डाऊन सुरू असणारच असल्याची माहिती,तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.

जत तालुक्यातील सोलापूर सीमावर्ती गावापर्यत कोरोना पोहचला आहे.त्यामुळे तालुक्यात पुन्हा अलर्ट राहण्याची वेळ आली आहे.सर्व बाजूने वाढत असलेल्या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जत शहरात गेल्या चार दिवसापासून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.जतकरांनी चार दिवस याला कडकडीत बंद पाळून मोठा प्रतिसाद दिला.रस्ते,चौक चार दिवस निर्मनुष्य झाले होते.प्रशासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल जतकरांचे अधिकाऱ्यांने अभिनंदन केले.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील जत पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घेरडी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने पुन्हा जतवर कोरोनाचे संकट घोघावत आहे.पुन्हा अलर्ट होण्याची वेळ आली असून काही दिवसानंतर पुन्हा जनता कर्फ्यू लावला जाण्याची शक्यता आहे.संपूर्ण जत तालुकाच 100 टक्के लॉक डाऊन करण्याची आली वेळ आली असल्याची काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.