Header Ads

धक्कादायक | गरीबांचा मोफत तांदुळ हडपला ; स्वस्तधान्याचा साठा केला सील

 

320

 


स्वस्तधान्य दुकानालगत साठा केलेली खाेली सील केली..एस.व्ही.पाटील असे सील केलेल्या स्वस्तधान्य दुकानदाराचे नाव आहे. 

गेल्या काही दिवसापासून या स्वस्तधान्य दुकानाबाबत मालाची पावती न देणे,शासनाने दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेणे,रेशन कार्डावर असलेल्या माणसापेक्षा कमी लोकांचा माल देणे,अशा अनेक तक्रारी होत्या.या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे गेल्या होत्या.त्यानुसार बुधवारी प्रशिक्षिणार्थी जिल्हाधिकारी आशिष येरेकर,प्रांताधिकारी प्रशांत आवटी,तहसीलदार सचिन पाटील,पुरवठा अधिकारी कोळी,तलाठी भोसले यांच्या पथकाने दुकानाला भेट देऊन तपासणी केली.तक्रारदार नागरिकांच्या तक्रारीची माहिती घेतली.त्यात तथ्य आढळल्याने दुकानातील धान्य,रजिस्टर व तक्रारदारांची रेशकार्ड तपासणीचे आदेश येरेकर व आवटे यांनी दिले.त्यानुसार नायब तहसील,पुरवठा लिपिक,तलाठी यांच्या उपस्थितीत धान्य दुकानातील तपासणीत 220 किलो तांदुळ साठा सापडला.रजिस्टरवरील तपासणीत व मालात तफावत वाटल्याने अधिकाऱ्यांनी लगतची खोली उघडण्याचे आदेश दिले.सुरूवातीला धान्यदुकान दारांने नकार दिला.अधिकाऱ्यांने कुलूप तोडण्यात येईल असे सांगितल्यानंतर कुलूप काढण्यात आले.त्यात कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गोरगरीबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सुमारे 800 किलो तांदुळ आढळून आला.त्याची तपासणी करून त्या मालासह खोलीला सील करण्यात आली आहे.

आंवढीतील या स्वस्तधान्य दुकानातून लॉकडाऊन काळातील तांदुळ,गहू रेशनकार्डवरील नोंदीनुसार मिळत नव्हता,शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारला जात असल्याचे तक्रारदाराचे आरोप होते.त्यांचे पथकांतील अधिकाऱ्यांने जबाब घेतले.त्याचे रेशरकार्ड,दुकानातील रजिस्टरची तपासणी केली आहे.अनेक गोष्टी संशास्पद वाटल्याने रितसर पंचनामा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

 


 

आवंढी रेशन दुकानदारांने गरीब जनतेचे धान्य हडप करण्याचा उद्योग केला आहे.अनेक दिवसापासून गावातील गोरगरीब जनतेच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार झाला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

 

 

 

 


 

आंवढीतील स्वस्तधान्य दुकानाच्या आलेल्या तक्रारीवरून दुकानाची तपासणी केली आहे.काही तक्रारीत तथ्य आढळल्याने दुकानातील रजिस्टर मालाचे पंचनामे करून लगतच्या एका खोलीत तांदूळ आढळल्याने ती खोली सील केली आहे. तो तांदूळ नेमका कुठला आहे,यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणार आहोत.

 

सचिन पाटील, तहसीलदार 

 

 

आंवढी ता.जत येथील स्वस्त धान्य दुकानदाराने तांदुळ ठेवलेली खोली व तांदुळ सील केला.

Blogger द्वारे प्रायोजित.