Header Ads

क्राइम न्यूज़ | विनयभंग,मारहाण प्रकरणी उटगीतील तरूणाविरोधात गुन्हा दाखल
 

 


उमदी,वार्ताहर : उटगी ता.जत येथील एका तरूणाने पती घरी नसताना अंगणात झोपलेल्या विवाहित महिलेला शारिरीक सुखाची मागणी केली. तिने नकार देताच तिला काठीने मारहाण केली.यासह घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.नागू श्रीशैल कोळगेरी (रा.उटगी, ता.जत) असे संशयित आरोपीचे नाव असून मंगळवारी दि. 21 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील उटगी गावात पिडीत महिला पती हे आपल्या दोन मुलांसह राहतात.पती हा द्राक्ष बागेत कामास जातो. मंगळवारी नेहमी प्रमाणे तो कामावर गेला. काम जास्त असल्याने रात्री उशिरा घरी परतणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले.रात्री जेवण झाल्यावर घरासमोर अंगणात पिडीत महिला आपल्या दोन्ही मुलासह झोपी गेली.दरम्यान, रात्रीचे 11.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी नागू कोळगेरी हा पिडीत महिलेल्या अंगावर पडला.महिला जागी होताच तिला शारिरीक सुखासाठी मागणी केली. मात्र, महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिला मारहाण केली.परिसरातील नागरिक गोळा होण्याच्या आत तिला घडलेल्या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर आरोपी नागू यांने तेथून पळू गेला. दरम्यान, रात्री उशिरा पती आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांना सांगितला. 

यानंतर बुधवारी सायंकाळी पिडीत महिलेने उमदी पोलिसांत याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी नागू कोळगेरी याच्या विरोधात 354,306,224 कलमानुसार गुन्हा दाखल केला असुन संशयित अरोपीस ताब्यात घेण्यात आहे आहे. अधिक तपास पोलिस हवालदार भगवान कोळी करत आहेत.


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.