Header Ads

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर | एक बहुआयामी व्यक्तीमत्व |


 


 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजन नेते यांचे परस्परांसोबत असलेले ऋणानुबंध व बहुजन समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान:


कृष्णराव केळुसकर गुरुजी यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार कार्यक्रम घेतला व यावेळी त्यांनी लिहिलेले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक बाबासाहेबाना भेट दिले. बाबासाहेबांची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द पाहून त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. केळुस्कर गुरुजी हे मूळचे कदम आहेत, जे मराठा आहेत. तर सयाजीराव महाराज हे सुद्धा मराठा होत. कोकणात खोती आंदोलन ज्यांनी चालविले ते नारायण नागु पाटील जे बाबासाहेबांना शेतकऱ्यांचा नेता घोषित करतात ते ही कुणबी होत. तसेच राजर्षी छ. शाहू महाराज यांना बाबासाहेबांच्या विषयी प्रचंड आदर होता त्यामुळे ते कोल्हापूरातुन मुंबईला डबक चाळीत येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात. ते अनेक परिषदात बाबासाहेब यांच्या सोबत सहभागी होत असत. 'मूकनायक' हे वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांचे अनुयायी बनले होते. तर मराठा जातीतील पहिले सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पी.बी. सावंत म्हणतात की बाबासाहेबांनी सुरू केलेल्या नाईट लॉ कॉलेज मुळे मला शिक्षणाची संधी मिळाली. तर भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब हयात असतानाच त्यांचा सन्मान म्हणून जगातील पहिला पुतळा 9 मार्च 1950 ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभारला होता. महाड आंदोलनावेळी ज्यावेळी सनातनी लोकांच्या भीतीने कोणीच गावात जागा देत नाही, त्यावेळी एका मुस्लिमानेच स्वतःची जागा उपलब्ध करून दिली होती. मौलाना शौकत अली हे लंडन राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांना अनेक मुद्द्यावर माहित देण्यासाठी मदत करत असत. संत गाडगेबाबा हे आपली संपत्ती बाबासाहेबांच्या कार्यासाठी सुपूर्द करण्यासाठी व्यवस्था करून सक्रिय पाठिंबा देत. सीताराम शिवतरकर,बी. जी. देवरुखकर, नांकचंद र.तु., सुरभानाना टिपणीस ही सर्व मदतीची माणसं होती.


बाबासाहेब ज्यांचा आदर्श घेवून कार्यरत राहिले ते शाक्यकुलीन शेतकरी राजपुत्र तथागत गौतम बुद्ध हे कुणबी होते. तर दुसरे आदर्श क्रांतिकारक संत कबीर होत, हे मोमीन होते. तर तिसरे आदर्श राष्ट्रपिता आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले हे माळी जातीतील होते. म्हणजे हे रक्ताचे किंवा जातीचे नसून विचारांचे आदर्श आहेत. जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेबांच्या प्रतिनिधित्वासाठी स्वतःचा राजीनामा देऊन त्यांना निवडून आणतात.


'मूकनायक' मुखपत्राच्या वर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग असे,


'काय करू आता धारूनिया भीड निःशंक हे तोंड वाजविले।'


तसेच ज्या 'मनुस्मृति' ने छ. शिवाजी महाराज यांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला होता, त्या अपमानाचा बदला रायगडाच्या पायथ्याशी 'मनुस्मृति'  दहन करून घेतला. अनेक पत्रांत सर्वात वर 'जय शिवराय' हे घोषवाक्य असायचे. तर राजगृहात शिवरायांची मूर्ती होती.


संत भगवानबाबा यांची 'नारायणगडाच्या' वादाबाबत भेट घेतली त्यावेळी कायदेशीर सल्ला दिला. संत भगवान बाबांनी पर्यायी गड निर्माण करून  शिक्षण आणि वसतिगृह सोयी, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सदाचार यासाठी ही कार्य केले. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांना आपला आदर्श मानताना म्हणतात,' जग बदल घालुनी घाव सांगूनी गेले मज भीमराव!' .


तुकोजी होळकर आणि मिस मिलर यांच्या विवाहमुळे  होळकर घराण्यात वाद निर्माण झाला होता त्यावेळी सर्वांना एकत्र करून 4 मार्च 1928 ला त्यांच्यात बाबासाहेबांनी समेट घडवून आणला होता. तसेच मातंग, चर्मकार जाती परिषदा घेवून त्यांच्या हक्क अधिकारांच्या लढाईचे नेतृत्व केले. ओबीसी ही ओळख 1928 ला सायमन कमिशन ला दिलेल्या मेमोरंडम मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. 1926 ला 'देशाचे दुष्मन' या पुस्तकाविरोधात कोर्टात लढण्यासाठी मा.जेधे, जवळकर या नेत्यांना बाबासाहेब कोर्टात युक्तिवाद करून केस जिंकून देतात.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानामध्ये देशातील सर्वात मोठा भाऊ ओबीसी साठी अगोदर तरतूद केली कलम 340 ने, त्यानंतर कलम 341 ने  अस्पृश्यासाठी  (अ. जा.  SC ) साठी ज्यात देशातील 1500 जातींना एकत्र करून अनुक्रम दिला आणि त्यानंतर अनुसूचित जमातीच्या बांधवासाठी कलम 342 ने प्रतिनिधित्वाच्या तरतुदी केल्या. सोबतच 5वी आणि 6वी अनुसूचीही ST साठी जोडली. बहुजननायक मान्यवर कांशीरामजी यांनी बाबासाहेबांचे कार्य आणि विचारधारा सामाजिक आणि राजकीय आंदोलनातून भारतभर घेवून जाण्याचा प्रयत्न केला होता.


 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जनतेला संदेश व आजचे भरकटलेले आंबेडकरी नेते व अनुयायी:


18 मार्च 1956 ला आग्रा येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया !" असे विधान केले होते. कारण, शिकलेले लोक बेइमानी करून समाजाची लुबाडणूक करीत आहेत. स्वतः चे कुटुंब, घर यांचीच पोटे भरत आहे. समाजाला वेळ, बुद्धी, पैसा देत नाहीत. आजची नेते मंडळी व अनुयायी बाबासाहेबांना मानते पण त्यांनी सांगितलेल्या संदेशाला मानत नाही.


बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात अनेक रात्री ते पायात डोके घालून फुंदत व रडत असत. स्वीय सहायक नानकचंद रत्तु यांनी 31 जुलै, 1956 या दिवशी धाडस करून विचारले की, "बाबासाहेब तुम्ही रात्र-रात्र झोपत नाहीत आणि असे का रडता?". त्यावेळी बाबासाहेब सांगतात, माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी केलेले धोकाधडीचे राजकारण आणि संघर्ष करून मिळविलेल्या हक्क अधिकार यांना पुढे नेणारे अनुयायी नसल्याचे दुःख यामुळे रडतो आहे! यातून आपण आता तरी  यातून  घेऊया व अंधभक्त न बनता बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी होऊया!


ज्या भारतीय संविधानामुळे प्रतिनिधित्व मिळाले, हक्क अधिकार मिळाले आणि देशात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित राष्ट्र निर्माण व्हावे व यासाठी "संविधान " टिकविणे, त्याचा संपूर्णपणे अंमल करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वामनदादा कर्डक म्हणत,


'भीमा तुझ्या मताचे जर पाच लोकं असते | तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते||


वाणीत भीम आहे, करणीत भीम असता | वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते||


धम्म अनुयायांनी पंचशील याचे पालन करावे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. पण आज असे होताना दिसत नाही. उलट ज्यांच्यामुळे प्रतिनिधित्व, संधी मिळाली त्या बाबासाहेबांच्या संदेशाला विसरून त्याउलट वर्तन करीत आहेत. बाबासाहेबांनी परदेशात थंड वातावरणात मदिरा सहजपेय असतानासुद्धा त्याठिकाणी आणि भारतात मदिरा सेवन केले नाही तसेच कोणतेच व्यसन केले नाही. आताचे आंबेडकरी नेते व अनुयायी जयभीम नावाचा 'चिअर्स' करून आपल्याच बांधवांना लुटत आहेत. कंदुऱ्या, जावळ, नवस-सायास, करून अनाठायी खर्च करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन न करता तसेच बौद्ध धर्माचे आचरण न करता हिंदू धर्माचे आचरण करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. आयुष्यभर मनुवादी वृत्तीशी लढले  त्या मनुवाद्यांच्या पक्षात व संघटनेत नेते व कार्यकर्ते सामील होतात याचे आत्मचिंतन त्यांनी आत्मचिंतन करावे. बाबासाहेबांनी तत्वाशी तडजोड ना करता अनेकवेळा मंत्रिपदाचा त्याग केला आहे. पण आजचे लाळघोटे नेते व त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांचे विचार सतत पायदळी तुडवत आहेत. त्यांना बाबासाहेबांच्या त्यागाचा विसर पडला असून त्यांनी आत्मचिंतन करण्याची अत्यंत गरज आहे.


असाह्य व परावलंबी जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या व  त्यांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेठवण्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणाऱ्या या महामानवाचे परिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झाले.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर समाजसुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आजतागायत पददलितांचे रक्षणकर्ते, कैवारी व मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये होते. आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी प्रत्येक भारतीयाची खात्री पटेल


बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याचे पदोपदी स्मरण करून समस्त आंबेडकरी नेते व अनुयायी यांनी एकाच राष्ट्रव्यापी संघटनेत सतत संघटितपणे कार्यरत राहणे हाच एकमेव पर्याय आहे. निश्चितच आपण यापुढे आपला वेळ, बुद्धी, श्रम आणि पैसा देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेवू व भारतीय संविधानाचा जागर करत राहू व त्याचे संरक्षण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम!!


आगामी: घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा जागर (भाग-२)


डॉ. राजेंद्र आनंदा लवटे 


विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग


राजे रामराव महाविद्यालय, जत


bryoraj@gmail.com 

14 एप्रिल, 2020 ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती. यानिमित्त आपण प्रस्तुत लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा व अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी केलेल्या सामाजिक चळवळींचा आढावा घेणार आहोत.
सामाजिक विचार: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने 'दलितांचे कैवारी' व 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हणून ओळखले जाते. परंतु ते खरे राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यसैनिक, कायदेपंडित, समाज सुधारक, राजकीय नेते, कार्यकर्ते, तत्वज्ञ, सामाजिक विचारवंत, राजकीय सुधारक, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, प्रख्यात तत्वज्ञानी लेखक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, संपादक, सत्यवादी, क्रांतिकारक आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याला पुनरुज्जीवन देणारे महान अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. दलितांविरूद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभावाविरूद्ध त्यांनी अनेक चळवळी व मोहीमा राबविल्या आणि महिला व कामगार वर्गाच्या हक्कांनाही पाठिंबा देऊन त्यांच्या न्याय मागण्या व अस्पृश्यता निर्मूलन यासाठी आयुष्यभर लढा दिला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री आणि जगातील सर्वात महान ग्रंथ ‘भारतीय संविधान’ याचे मुख्य शिल्पकार होते. आंबेडकर म्हणत कि “आयुष्य हे किती जास्त वर्षे जगलात यापेक्षा ते किती महान कार्य करून जगलात हे महत्वाचे आहे”.

इ.स.1924 नंतर आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि अस्पृश्यतेच्या उच्चाटनासाठी निरंतर प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन अस्पृश्यांचा उद्धार आणि भौतिक प्रगती यासाठी समर्पित केले. आंबेडकरांनी समाज सुधारकांना समाजातील असमानतेविरुद्ध लढा देण्यासाठी आणि सर्व मानवी जगतात स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केले. भारताच्या प्रगतीत अस्पृश्यता हाच मुख्य अडथळा आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. मनुस्मृतिच्या अनुयायांच्या जातीआधारित श्रेष्ठत्व आणि सामाजिक भेदभाव या सिद्धांताला आंबेडकर यांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या मते अस्पृश्यता निर्मूलनाचा संबंध हा धार्मिक विचारांचा बडगा झुगारून जातीव्यवस्था नष्ट करण्याशी होता. म्हणूनच, त्यांनी जातीव्यवस्थेचा अभ्यास व विश्लेषण करते वेळी, त्यांनी रूढी-परंपराप्रिय सनातनी हिंदू लोकांच्या तीव्र नाराजीचा धैर्याने सामना करत हिंदू धार्मिक तत्त्वज्ञानाचा चिकित्सक अभ्यास केला. अस्पृश्य लोकांचे जीवन सकारात्मकरीत्या बदलण्यासाठी, त्यांच्या प्रगती आणि उन्नतीसाठी कायदेशीर हक्कांसाठी कायदे करण्याचा मार्ग त्यांनी तयार केला. एक सच्चा स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक विचारवंत, राजकीय सुधारक, तत्वज्ञानी लेखक आणि अस्पृश्यांचा मुक्तिदाता अशा बहुआयामी आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाकडे भूतकाळातील तसेच वर्तमानकाळातील लेखक व प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केले आहे. आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाऐवजी काही लोकांनी आपल्या जीवनात फक्त अस्पृश्यांचा उद्धार करण्याचे काम केले म्हणून त्यांचा प्रामुख्याने फक्त ‘दलित नेता’ म्हणून  प्रसार केला तसेच हिंदू धर्माचे चिकीत्स्तक अभ्यासक व कडवे टीकाकार आणि एक महान सामाजिक बंडखोर नेता अशी चुकीची प्रतिमा रेखाटली.  आंबेडकरांनी इतर अनेक क्षेत्रात  दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यास प्रसारमाध्यमे, लेखक व भारतीय समाज अपयशी ठरले किंवा हेतूपूर्वक दुर्लक्ष करत आले ज्यामुळे भारतातील केवळ दलितच नव्हे तर एकूणच प्रत्येक जाती, समुदाय आणि धर्मातील प्रत्येक नागरिकाच्या सुधारणांवर परिणाम झाला.

बालपण व शिक्षण: डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रत्नागिरीतील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांची आई भिमाबाई आंबेडकरांच्या लहानपणीच वारली. पण त्यांचे वडील रामजी हे विधेचे भोक्ते होते. रामजी हे सैन्यात सुभेदार मेजर पदापर्यंत पोहचले होते. भीमरावाचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. त्यांचे मूळ आडनाव त्यांच्या जनस्थळावरून आंबवडेकर असे होते. त्यांच्या एका शिक्षकाचे नाव आंबेडकर होते. त्यांच्या प्रेमळ गुरूच्या आदरापोटी त्यांनी आंबेडकर हे आडनाव लावले. त्यानंतर बाबासाहेब मुंबई येथे स्थायिक झाले व भायखळा येथे 1906  मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. शालेय शिक्षण घेताना पदोपदी अस्पृश्यतेची जाणीव होत होती. शाळेत सर्वात शेवटच्या बाकावर बसावे लागे. संस्कृत विषयाची आवड असूनही त्यांना अभ्यासासाठी घेता आला नाही.1907 मध्ये बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा पास झाल्यामुळे एस. के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित त्यांच्या सत्कार समारंभात केळुसकर गुरुजीनी स्वलिखित 'भगवान बुद्धांचे चरित्र 'हे पुस्तक त्यांना भेट दिले. पुढे महाराजा सयाजीराव गायकवाडांची 25 रु. शिष्यवृत्ती त्यांना शिक्षणासाठी मिळाली. त्यांनी 1912 ला मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र तसेच पर्शियन व इंग्रजी या विषयातही बी.ए. पदवी मिळवली. याच धावपळीत 2 फेब्रुवारी, 1993 ला वडिलांचे निधन झाल्यामुळे बाबासाहेबांना एक मोठा धक्का बसला. एकीकडे कौटुंबिक जबाबदारी व दुसरीकडे उच्चशिक्षण घेण्याची ओढ व त्यासाठी लागणारा खर्च अश्या दुहेरी संकटात बाबासाहेब सापडले.

उच्चशिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक अडचणींचा मार्ग निघाला. बडोद्यात आर्य समाजाच्या कचेरीत राहण्याची व महारवाड्यात जेवणाची सोय झाली. केळुस्कर गुरुजी यांच्या मदतीने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी 1993 ते 1916 या तीन वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांनी शिष्यवृत्तीची रक्कम फिटेपर्यंत बडोदा संस्थानाची नोकरी करावी अशी अट होती. शिष्यवृत्तीमुळे जून 1915 साली कोलंबिया विद्यापीठ यांची एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी "ऍडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी" या विषयावर प्रबंध लिहिला.1917 ला पीएच. डी. करिता " नेशनल डिवीडेंट ऑफ इंडिया: ए हिस्टोरिकेल अँड ऍनालीटीकल स्टडी" या विषयावर प्रबंध सादर केला. पुढे "कास्ट इन इंडिया, देयर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट" हा शोधनिबंध लिहिला.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला. 1922 ला ग्रेस इन मधून बॅरिस्टर ही पदवी प्रचंड अभ्यास करून मिळवली.1923 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डी.एस्सी. हि अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी दिली. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. प्रचंड अभ्यास करून उच्चविद्या संपादन करत राहिले. जागतिक विद्वान म्हणून त्यांचे स्थान अग्रक्रमाने आहे. मुंबईत आल्यावर त्यांनी वर्स कॉलेज या व्यापारी शिक्षण संस्थेत त्यांना अर्थशास्त्र, बँकिंग, कायदा हे विषय शिकवण्यासाठी नोकरी मिळाली. छ. शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्यातून त्यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक काढले. मुंबईत पुन्हा त्यांनी वकिली सुरु केल्यावर अस्पृश्यता निवारण हे त्यांनी आपले काम मानले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेविरुद्ध लढा: बाबासाहेब उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर प्राध्यापक,प्राचार्य, न्यायाधीश अशा मोठ्या नोकऱ्या वाट पाहत होत्या तर अनेक व्यक्ती, संस्था तयार नोकरी देण्यास तयार होत्या. परंतु आंबेडकरांनी सुरवातीला काही काळ नोकरी केल्यावर वकिली सुरु केली व नोकरी न करता बहुजन समाजातील अन्यायग्रस्त शोषित वंचित दुर्बल शूद्रअतिशूद्र यांच्या संवेदना जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरविले. याचा एक भाग म्हणून 20, जुलै,1924 ला परेल मुंबई येथे 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली. हिचे चेअरमन म्हणून स्पर्श व्यक्ती डॉ. सर चिमनलाल सेटलवाड तर सचिव म्हणून चर्मकार असलेले सीताराम शिवतरकर तर कार्यकारी अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. "Educate, Oraganize and Agitate" अर्थात "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हा मूलमंत्र ठरविला. अस्पृश्यांना शिक्षण देऊन त्यांना न्याय, सामाजिक, आर्थिक समतेसाठी अहिंसक मार्गांचा अवलंब करण्यास त्यांना प्रवृत्त केले. अस्पृश्यांना संघटित करून त्यांनी चर्चा, सभा, परिषद, सत्याग्रह, वृत्तपत्रे, संमेलन या मार्गांचा अवलंब केला. अस्पृश्यांच्या नशिबी समाजव्यवस्था तसेच धर्मव्यवस्थेमुळे दारिद्र्य व कर्जबाजारीपणा आला आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृहे काढली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या ओळखीची सुरवात हि 1916 मध्ये बाळू पालवनकर या क्रिकेटपटूच्या सत्काराच्या निमित्ताने झाली. पी.बाळू हा त्या काळातील अतिशय उत्तम असा क्रिकेटपटू होता. परंतु अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चर्मकार जातीतील असल्याने मनुवादी व्यवस्थेने त्याचे नाव कधीच पुढे येऊ दिले नाही. आंबेडकरांचा जन्म अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तसेच सामाजिक व आर्थिक भेदभाव केला जाणाऱ्या महार (दलित) जातीत झाला होता.  आंबेडकरांनी वैक्तिक अस्पृश्यतेचे अपमानकारक चटके सहन होते व अशा अनेक प्रसंगांचे ते स्वतः साक्षीदार होते.
1916 ते 1956 या चाळीस वर्षाच्या कालखंडात बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी, सामाजिक आंदोलने यांच्या विक्रमांची नोंद इतिहासात झाली आहे. त्यामुळे स्त्रियांसह सर्व बहुजन बांधवाना सन्मानाने माणूस म्हणून जीवन जगून प्रगतीच्या शिखरावर जाता आले. बाबासाहेबांची चार मुले, पत्नी रमाई यांच्यावर वेळेवर औषधोपचार आणि कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे मृत्यू पावली. भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता रुजावी व त्यांचा संसार सुखी समाधानी व्हावा म्हणून बाबासाहेबांनी आपले आयुष्य व वैयक्तिक संसार पणाला लावला हे सर्व भारतीयांनी ध्यानात घेतले पाहिजे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळी:1927 नंतर आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरूद्ध सक्रिय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सार्वजनिक पाणवठे खुले करून अस्पृश्याना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आंदोलने व मोर्चे काढायला सुरवात केली तसेच तसेच हिंदू मंदिरात प्रवेश मिळवा यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. अस्पृश्य लोकांच्या हक्काचे शहराच्या मुख्य चवदार तळ्यातील पाणी मिळावे यासाठी महाडच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला ज्यात 'मनुस्मृती' हा प्राचीन वैदिक ग्रंथ जी.एन. सहस्रबुद्धे या ब्राम्हणाने जाळला. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या पुढील अस्पृश्यांच्या सामाजिक चळवळींमुळे त्यांना 'दलितांचे कैवारी' म्हणून उदयास आणले.

1) महाडचा सत्याग्रह: आंबेडकरांच्या चळवळीच्या राजकारणाची सुरुवात महाड ते चवदार तळे या मोर्चाने झाली. 1925 मध्ये, महाराष्ट्रातील मुंबईच्या दक्षिणेकडील महाडच्या नगरपरिषदेने शहरातील चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास अस्पृश्यांना कडकपणे बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. तथापि, प्राण्यांना पाणी वापरण्याची परवानगी होती. आंबेडकरांनी समाजाच्या या अमानवी वृत्तीला आव्हान देऊन सामाजिक क्रांतीच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली.20 मार्च,1927 रोजी या ठरावाविरोधात चवदार तळ्यातील सार्वजनिक ठिकाणी पाणी आणण्याचा व पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी आंबेडकरांनी दहा हजार सत्याग्रहींच्या मोर्चाचे नेतृत्व केले. सत्याग्रह्यांनी टाकीमधून यशस्वीरीत्या पाणी आणल्यानंतर अफवा पसरली गेली की अस्पृश्य लोक महाडमधील विरेश्वर मंदिरात प्रवेश करण्याच्याही विचारात आहेत. अशा अफवांनी चिथावणी मिळालेल्या उच्च जातीच्या हिंदूंच्या मोठ्या जमावाने लाठीहल्ला केला आणि अस्पृश्यांना जखमी केले. पहिल्या महायुद्धात शौर्य दाखवलेले अनेक निवृत्त झालेले लोक या मोर्चात सहभागी होते. यानंतर काही दिवसांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले आणि या हल्ल्याचा  सूड उगवण्यासाठी परवानगी मागितली. आंबेडकर आक्रमक स्वभावाचे व जहाल विचारांचे नसल्याने त्यांनी प्रतिहल्ल्यास नकार दिला. बाबासाहेबांचे अंतर्मन हे मानवतावादी असल्याने अशा परिस्थितीत अहिंसेवर दृढ विश्वास ठेवत. ते आवाहन करीत व सांगत “आपल्याला शारीरिक लढाई नको आहे जिथे आपण केवळ काही लोकांना दुखवू शकतो; आपण यापेक्षा तीव्र लढा उभारू ज्यामुळे जातीयवादाच्या शत्रूंशी लढू शकू”.

2. मनुस्मृती दहन: 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती चे दहन केल्यामुळे महाड शहराचे नाव हे परत एकदा मानवी हक्कांच्या लढ्याशी कायमस्वरुपी जोडले गेले आहे. आंबेडकरांनी 20 डिसेंबर, 1927 रोजी सत्याग्रहींच्या परिषदेचे आयोजन केले होते. सदर परिषदेत पहिल्यांदा मानवी हक्काचा ठराव संमत करण्यात आला ज्याद्वारे समानतेचे तत्त्व मान्य करून जातीव्यवस्था रद्द करण्याची मागणी केली. यानंतर ‘मनुस्मृती’चा निषेध करण्याचा ठराव घेण्यात आला.

चवदार हौदातून पाणी घेण्याचा अधिकार स्थापित करण्याच्या अभियानाचा भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला होता.  अस्पृश्य लोकांच्या परिषदेत जाहीरपणे व उघडपणे मनुस्मृती दहन करणे हे क्रांतिकारी पाऊल होते. मनुस्मृती हा जरी हिंदूंचा पवित्र ग्रंथ असला तरी मनू जाती आणि अस्पृश्यतेचे केवळ समर्थन करत नाही तर त्यांना कायदेशीर मंजुरी देखील देतो. मनुस्मृतीत असमानतेची भावना रुजलेली आहे. ती अस्पृश्यांना हिंदूंच्या परिघाबाहेर ठेवते कारण, ती पाचव्या वर्णांला मान्यता देत नाही. अस्पृश्यांना मनुस्मृतीतील अमानवतेची व भेदाभेद करणारी तत्वे अमान्य होती व पिढ्यानपिढ्या अस्पृश्य लोकांना अमानवी वागणूक देत असल्यामुळे तिचे ब्राह्मणांसमक्ष दहन केले. मनुस्मृती दहनाला अस्पृश्यांच्या मुक्तीच्या इतिहासाइतकेच महत्व आहे. मनुस्मृती दहन हे एक क्रांतिकारक पाऊल होते. कारण मनुस्मृतीतील शास्त्रवचनांच्या आधारे उच्चवर्णीय लोक उघडपणे अमानुष कायद्यांचा पुरस्कार करून अस्पृश्यांच्या समानतेचा व न्याय हक्काला जाहीरपणे विरोध करत होते.

3) मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यास विरोध: हिंदू लोकांनी पाळलेल्या जनावरांपैकी एखादे जनावर मृत पावल्यास त्याला गावाबाहेर नेऊन त्याची त्वचा काढणे हे एक काम होते.  मृत त्वचा काढून टाकणे आणि मृत जनावरे नेणे हे खेड्यांमधील अस्पृश्यांचे एक कर्तव्य होते. अस्पृश्य लोकांनी हिंदूंचे हे काम करण्यास करण्यास नकार दिल्यास ते ज्या जागेवर राहतात ती जागा जप्त केली जात होती. त्यांना एकतर अशी घाणेरडी कामे करणे किंवा उपासमार सहन करणे यापैकी एका गोष्टीची निवड करावी लागत असे. महत्त्वाची बाब म्हणजे, 20 डिसेंबर,1927 रोजी आंबेडकरांनी आयोजित केलेल्या अस्पृश्य लोकांच्या परिषदेने सर्वप्रथम समानतेचे तत्व मानणारी आणि जातीव्यवस्था संपुष्टात आणण्याची मागणी करून मानवी हक्कांची घोषणा केली आणि अस्पृश्य लोकांनी उच्चवर्णीय हिंदूंच्या मृत जनावरांची कातडी काढून टाकणार नाही किंवा गावाबाहेर विल्हेवाट लावणार नाहीत किंवा ते कापून खाणार नाहीत असा संकल्प केला. या ठरावातील सूक्ष्म व समग्र उद्देश हा अस्पृश्यांमधील स्वाभिमान, स्वप्रतिष्ठा वाढवणे आणि हिंदू सामाजिक व्यवस्थेला धक्का देणे हा होता. तसेच हिंदूंना अशी घाणेरडी कामे त्यांनी स्वतःच करण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त करणे हा उद्देश होता. हिंदूंच्या प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेविरूद्ध झालेल्या बंडाच्या इतिहासाचा उगम मुंबईत झाला, पण त्याचा भारतातील इतर सर्व भागात प्रसार झाला.


4) मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह: आंबेडकरांनी आपली लढाई राजकीय आणि धार्मिक अश्या दोन्ही पातळीवर सुरु ठेवली. अस्पृश्यांना संस्कृत आणि हिंदू शास्त्रांचा अभ्यास करण्याचा हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार न्हवता. म्हणून आंबेडकरांनी अस्पृश्यांना हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळावा यासाठी सत्याग्रह सुरू केला.1929 मध्ये, पुणे येथे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये निशस्त्र अस्पृश्य लोकांवर उच्चवर्णीय हिंदूंनी हल्ला करून जखमी केले.  जखमी लोकांमद्धे अस्पृश्य चेंबरचे नेते पांडुरंग नथूजी राजभोज आणि एन. व्ही. गाडगीळ (काकासाहेब गाडगीळ म्हणून लोकप्रिय होते) यांचाही समावेश होता. 2 मार्च,1930 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात अनेक सत्याग्रहींना उच्च वर्णीय हिंदूंनी तुफान दगडफेक करून गंभीर जखमी केले होते. सत्याग्रहींना या हल्ल्याचा बदला घ्यायचा होता. पण बाबासाहेबांनी नेहमीच राजकीय नेत्यासारखे शहाणपण, नेतृत्वगुण, साहसी वीरासारखे धैर्य, सहनशीलता यांचे नेहमी दर्शन घडवून कार्यकर्त्यांना शांततेत राहण्याचा आणि आक्रमकपणे सूड न घेण्याचा सल्ला दिला.

1930 ते 1935 अशी पाच वर्षे प्रदीर्घ काळा पर्यंत काळाराम मंदिर सत्याग्रह केला जात होता, परंतु अस्पृश्याना मंदिर प्रवेश करू देण्यास जेव्हा रूढीवादी हिंदूंच्या मनात जराही पाझर फुटला नाही. आंबेडकरांनी एका संपादकीय लेखात उच्च वर्णियांना इशारा दिला होता कि, “समाजात आम्हाला समान हक्क हवा आहे, एकतर शक्यतो आम्ही हिंदू जातीमध्ये राहून किंवा गरज पडल्यास या निरुपयोगी हिंदू अस्मितेला लाथाडून समान हक्क मिळवू. आणि जर हिंदू धर्म सोडून देणे आवश्यक असेल तर आता आपल्याला मंदिरे व त्यांच्या प्रवेशासाठी चिंता करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हिंदू धर्मात राहिल्यास माणुसकीचे व समानतेचे हक्क मिळणार नाहीत यासाठी हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक वाटले. येवला येथील 13 ऑक्टोबर,1935 मध्ये परिषदेत  तेव्हा आंबेडकरांनी लोकांसमोर शपथ घेतली की, "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही". हिंदू म्हणून असलेली ओळख लाथाडण्याच्या मूलगामी निर्णयामुळे हिंदू समाजाला धक्का बसला आणि ह्या सर्व गोष्टींचा परिपाक आंबेडकर बौद्ध धर्माकडे वळण्याकडे व शेवटी तो स्वीकारण्यात झाला. पुढे त्यांनी मृत्यूपूर्वी 14 ऑक्टोबर,1956 रोजी नागपूर येथील ऐतिहासिक समारंभात आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
5. पुणे करार: 1932 मद्धे इंग्लंचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी ऑगस्ट मध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. अस्पृश्यांना हिंदू धर्मातून फोडण्याचा इंग्रजांचा डाव आहे असे सांगून त्याला प्रखर विरोध केला व उपोषण सुरु केले. आंबेडकर राजकीयदृष्ट्या आपल्या दृढनिश्चयावर ठाम असत. परंतु पुणे करारावर स्वाक्षरी करणे ही आंबेडकरांच्या मानवतावादी गुणांची साक्ष देते. त्यांना गांधींच्या उपोषणामागची भूमिका समजली होती आणि करारावर स्वाक्षरी केल्याने अस्पृश्यांच्या हक्कावर होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना पूर्ण कल्पना होती. परंतु गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी गांधींसोबत तडजोड केली व पुणे करारावर सह्या केल्या.
यानंतर बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली व 1937 च्या निवडणुकीत या पक्षाला 13 राखीव जागा मिळाल्या व त्यांनी मजूरमंत्र्याचे काम करताना मजुरांना निवारा व मुलांचे शिक्षण व मोफत वैदयकिय उपचारांची सोया केली.

अस्पृश्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यांनी अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ची स्थापना केली.1952 च्या निवडणुकीत या फेडरेशनने 22 जागांपैकी 13 जागा जिंकल्या. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान:

कोकणामध्ये सुरु असलेल्या खोती आंदोलनात  नारायण नागु पाटील हे मार्गदर्शन करत होते. बाबासाहेबांनी 1917 ला 'लहान शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय' या संशोधन पत्रिकेत नोंदघेऊन या आंदोलनाला बळकटी दिली.

याच नंतर नारायण नागू पाटील म्हणजेच आजचे शेकाप चे नेते जयंत पाटील यांचे आजोबा यांनीबाबासाहेबांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून जाहीर केले. ज्यामुळे डॉ. आंबेडकरांनी मुंबईहून 600 किलोमीटरचा जहाज- बैलगाडी-पायी प्रवास करून शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे चालविले.

चरीचा संप हा भारतातील शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला ज्यात पंचवीस गावातील शेतकरी शेतात गेले नाहीत. उपासमार होऊ नये म्हणून त्यांना  बाबासाहेबांनी मुंबई येथून मदत मिळवून दिली.1928 मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये अर्थसंकल्पावर भाषण करताना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी योजना मांडल्या. 65 वर्षावरील पुरुष व महिला शेतकरी यांना पेन्शन देण्यात यावे अशी शिफारस केली. बाबासाहेबांनी 1938 ला मुंबईत 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. या आंदोलनामुळे दोन लाख हेक्टर जमीन ही कुळाच्या नावावर झाली. हे या बाबासाहेबांच्या आंदोलनाचे फलित होय. बाबासाहेबांनी या देशाचा पंतप्रधान हा शेतकऱ्यांचा मुलगा असावा आणि प्रशासनातील अधिकारी ही शेतकऱ्यांची मुले असावीत असा विचार मांडला. ज्यावेळी चिपळूणकर यांनी शेतसारा वाढवावा अशी केसरी वर्तमानपत्रात लेख लिहून मागणी केली त्यावेळी बाबासाहेबांनी त्यास विरोध केला आणि त्यापेक्षा मिळकत कर वाढवावा अशी मागणी केली. शेती व शेतक-याच्या संदर्भात बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये कलम 323 बी ते 323 जी मध्ये शेतकरी आयोग हमीभाव यासह अनेक तरतुदी केल्या  आहेत. परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने त्या कधीं समजू दिल्या नाहीत आणि आम्हीही घरात संविधान नसल्याने त्या कधीं समजून घेतल्या नाहीत.

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कष्टकरी कामगारांसाठी योगदान:

बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व, बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य याची जाणीव इंग्रजांना निश्चितपणे झालेली होती आणि म्हणून जुलै 1942 ला केंद्रीय मंत्रिमंडळात बाबासाहेबांना कॅबिनेट मंत्री बनवलं. इरिगेशन मिनिस्टर म्हणून काम करत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा 'शेतकऱ्यांचा आसूड' डोळ्यासमोर ठेवून  भाक्रा नांगल धरण , दामोदर खोरे प्रकल्प, महानदी, कोसी, गंगा, ब्रह्मपुत्रा यावर नद्यांवर प्रकल्प उभारले. जलविद्युत निर्मिती, जलवाहतूक पर्यटन स्थळांचा विकास, छोटे छोटे धरण आणि जल आयोगाची निर्मिती केली. पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना, गरिबांना वीज स्वस्तात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली. स्वतः कामगारांच्या चाळीत राहिल्यामुळे कामगारांचे मूलभूत प्रश्न, समस्या त्यांना माहित  होत्या. कामगार मंत्री म्हणून निर्णय घेत असताना कामगारांच्या संघटना व  व्यवस्थापन यामध्ये चर्चा घडवून आणल्या. व्यवस्थापनात कामगारांचे प्रतिनिधी असावेत अशी व्यवस्था केली. आसाम मध्ये चहामळा कामगार, पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाण कामगार यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या. एका खोल खाणीतून वर आलेल्या  खाणकामगार प्रश्न विचारून चर्चा केली व त्याच ठिकाणी आदेश काढून महिला आणि पुरुष यांना समान मजुरी तसेच कामाचे तास 12 वरून 8 तास केले. प्रसूती रजा ही पगारी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठी योगदान: बाबासाहेबांना  भिमाई असे सुद्धा म्हटले जाते. ज्या 'मनुस्मृती' ने हिंदू धर्मातील सर्व जातीतल्या स्त्रियांना अतिशय हीन, नीच लेखले त्या 'मनुस्मृती' चे त्यांनी दहन केले. पुढे बाबासाहेबांनी पर्यायी व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. महिलांची सभा घेऊन त्यांना "स्वच्छ राहा, पांढरपेशा स्त्रीयांप्रमाणे पोशाख करा. नवरा मुले हे दारू पिवून येत असतील तर त्यांना घरात घेवू नका. मुला मुलींना शिक्षण द्या. "कलम 13 मनुस्मृति अवैध , कलम 14 सर्व स्त्री-पुरुष समान, कलम 15 भेदभाव नष्टता, कलम 16 नोकरीत आरक्षण, कलम 19 भाषणं स्वातंत्र्य, कलम 25 धर्म स्वातंत्र्य यासह अनेक तरतुदी आहेत.

बाबासाहेबांनी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत येताना एका स्त्रीला-आई / बहिण/ पत्नी यांना सोबत घेवून या असे आवाहन केल्यावर पन्नास हजार पुरुष आणि पंचवीस हजार स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. बाबासाहेब स्त्रियांना त्यांची केशभूषा, वेशभूषा कशी नीटनेटकी असावी, तसेच कुटुंबनियोजन, चुकीच्या गोष्टीसाठी नकार देण्यास शिकणे याबाबत मार्गदर्शन करत. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानाचा सामान अधिकार दिला. 'हिंदू स्त्रियांची अवनती' हा संशोधन पेपर तसेच हिंदूकोड बीला बाबासाहेबांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी उपाययोजना सांगितल्या आहेत. परंतु त्यांचा त्यावेळेपासून आजपर्यंत अंमल केला नाही.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरू मंत्रिमंडळातून  राजीनामा देण्यासाठी ही हिंदू कोड बील लागू करत नाहीत, हे एक कारण होते. किमान हे 'हिंदुकोडबील' समस्त महिलांनी वाचावे व त्यातील मागण्या मान्य मान्य करून घेण्यासाठी लढा द्यावा.

नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिला यांनी आपल्या आज जे काय फायदे मिळाले आहेत, याचे कारण किंवा स्रोत शोधला की त्यांना समजेल कि यासाठी  जोतिबा व सावित्रीमाई फुले, राजर्षी छ. शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि त्याग, समर्पण आहे. नाहीतर धर्माने अनेक बंधन घालून फक्त चूल आणि मुलं एवढ्यावर मर्यादित करून तिला 'गुलाम' बनविले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक कार्य व लेखन यातून विद्यार्थ्यांसाठी दिलेलं योगदान:

महात्मा फुले यांनी सांगितलेच होते की मती, नीती, गती, वित्त व स्वाभिमान हे शिक्षणामुळे येते. अस्पृश्यांना शिक्षण देण्याखेरीज त्यांची प्रगती होणार नाही  हे ओळखून म. फुले यांच्या राजमार्गावर वाटचाल करून बाबासाहेबांनी शिक्षण प्रसारावर भर दिला. 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा मंत्र त्यांनी जनतेला दिला. बहिष्कृत हितकारिणी संस्थेच्या वतीने अस्पृश्यांसाठी वाचनालये, प्रौढांसाठी रात्रशाळा सुरु केल्या. 4 जानेवारी, 1925 ला सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. ज्याचे व्यवस्थापक शिवाप्पा एस. आयदले होते. तसेच 10 जुलै 1925 ला निपाणी येथे वसतिगृह काढले ज्याचे व्यवस्थापक बी. एच. वराळे होते. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना अनेक भाषणांमधून विविध विषयांवर मार्गदर्शन करताना शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती, गरिबीचे भांड्वल कुणीही करू नये असे कारण सर्वात जास्त गरिबी मी अनुभवली आहे असे सांगत. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून ज्ञानार्जन करावे व त्यांच्याकडे शील असावेच असे आवाहन करीत.

अस्पृश्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून त्यांनी १९४६ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व संस्थेच्या च्या माध्यमातून  मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व नाईट लॉ कॉलेज, औरंगाबादला मिलिंद कॉलेज, पुण्याला स्कुल ऑफ पोलिटिक्स ची स्थापना केली. विविध वसतिगृहांची स्थापना करून दलित  शैक्षणिक समस्या सोडवल्या व अनेक विद्यार्थी घडवले.

समाजाच्या विचारला चालना देऊन त्यांनी वृत्तपत्राद्वारे दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार व त्यांची दुःखे समाजापुढे  प्रयत्न केला. छ. शाहू महाराज यांच्या मदतीने त्यांनी 'मूकनायक' हे वृत्तपत्र 1920 मध्ये सुरु केले.1927 मध्ये 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक वृत्तपत्र, तर 1928 मध्ये समता संघातर्फे 'समता' पत्र तसेच 'जनता' व 'प्रक्षुब्ध भारत' हि पत्रे सुरु केली.
 ग्रंथाना गुरु मानणाऱ्या बाबासाहेबांनी ग्रंथाद्वारे समाजप्रबोधनाचे व प्रयत्न केले. त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. जेव्हा जेव्हा ते परदेशात गेले तेव्हा त्यांनी मोठ्या संख्येने पुस्तके गोळा केली. एकदा त्यांनी न्यूयॉर्कमधून तीन हजाराहून अधिक पुस्तके खरेदी करून भारतात आणलीहोती. त्यांच्याकडे एक वैयक्तिक लायब्ररी होती ज्याला त्यांनी "राज गृह" असे नाव दिले होते. बाबासाहेबांना लिहिण्याची आवड होती. राजकारणापासून बौद्ध धर्मापर्यंत, भारतातील जातींपासून ते भारतातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींपर्यंतच्या अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे 50 हजार पुस्तकं होती. पैकी 30 हजार वाचून टिपण काढलेले होते. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असूनही त्यांनी सर्व ग्रंथलेखन इंग्रजीतून केले. त्यांनी लिहिलेले ग्रंथसंपदा: कास्ट्स इन इंडिया: देअर जेनेसिस (1918),  मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट (1918), अनहिलेशन ऑफ कास्ट (1937), फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम (1939), व्हॉट काँग्रेस अँड गांधी ह्याव डन टू अनटचेबल्स (1945). हू वेअर शूद्राज (1946), द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स (1948), रानडे, गांधी अँड जीना, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म, कॉन्स्टिटूशन ऑफ इंडिया यासह 22 ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चा पाया रचला गेला आहे. त्यांची ग्रंथसंपदा http://www.ambedkar.org या वेबसाईट वर उपलब्ध असून अभ्यासकांनी जरूर पहावी.

डॉ बाबासाहेब आंबेडकर व बहुजन नेते यांचे परस्परांसोबत असलेले ऋणानुबंध व बहुजन समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान:

कृष्णराव केळुसकर गुरुजी यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार कार्यक्रम घेतला व यावेळी त्यांनी लिहिलेले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक बाबासाहेबाना भेट दिले. बाबासाहेबांची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द पाहून त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. केळुस्कर गुरुजी हे मूळचे कदम आहेत, जे मराठा आहेत. तर सयाजीराव महाराज हे सुद्धा मराठा होत. कोकणात खोती आंदोलन ज्यांनी चालविले ते नारायण नागु पाटील जे बाबासाहेबांना शेतकऱ्यांचा नेता घोषित करतात ते ही कुणबी होत. तसेच राजर्षी छ. शाहू महाराज यांना बाबासाहेबांच्या विषयी प्रचंड आदर होता त्यामुळे ते कोल्हापूरातुन मुंबईला डबक चाळीत येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात. ते अनेक परिषदात बाबासाहेब यांच्या सोबत सहभागी होत असत. 'मूकनायक' हे वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांचे अनुयायी बनले होते. तर मराठा जातीतील पहिले सर्वोच्च न्यायालयातील   न्यायाधीश पी.बी. सावंत म्हणतात की बाबासाहेबांनी सुरू केलेल्या नाईट लॉ कॉलेज मुळे मला शिक्षणाची संधी मिळाली. तर भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब हयात असतानाच त्यांचा सन्मान म्हणून जगातील पहिला पुतळा 9 मार्च 1950 ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभारला होता. महाड आंदोलनावेळी ज्यावेळी सनातनी लोकांच्या भीतीने कोणीच गावात जागा देत नाही, त्यावेळी एका मुस्लिमानेच स्वतःची जागा उपलब्ध करून दिली होती. मौलाना शौकत अली हे लंडन राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांना अनेक मुद्द्यावर माहित देण्यासाठी मदत करत असत. संत गाडगेबाबा हे आपली संपत्ती बाबासाहेबांच्या कार्यासाठी सुपूर्द करण्यासाठी व्यवस्था करून सक्रिय पाठिंबा देत. सीताराम शिवतरकर,बी. जी. देवरुखकर, नांकचंद र.तु., सुरभानाना टिपणीस ही सर्व मदतीची माणसं होती.

बाबासाहेब ज्यांचा आदर्श घेवून कार्यरत राहिले ते शाक्यकुलीन शेतकरी राजपुत्र तथागत गौतम बुद्ध हे कुणबी होते. तर दुसरे आदर्श क्रांतिकारक संत कबीर होत, हे मोमीन होते. तर तिसरे आदर्श राष्ट्रपिता आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले हे माळी जातीतील होते. म्हणजे हे रक्ताचे किंवा जातीचे नसून विचारांचे आदर्श आहेत. जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेबांच्या प्रतिनिधित्वासाठी स्वतःचा राजीनामा देऊन त्यांना निवडून आणतात.

'मूकनायक' मुखपत्राच्या वर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग असे,

'काय करू आता धारूनिया भीड निःशंक हे तोंड वाजविले।'

तसेच ज्या 'मनुस्मृति' ने छ. शिवाजी महाराज यांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला होता, त्या अपमानाचा बदला रायगडाच्या पायथ्याशी 'मनुस्मृति'  दहन करून घेतला. अनेक पत्रांत सर्वात वर 'जय शिवराय' हे घोषवाक्य असायचे. तर राजगृहात शिवरायांची मूर्ती होती.

संत भगवानबाबा यांची 'नारायणगडाच्या' वादाबाबत भेट घेतली त्यावेळी कायदेशीर सल्ला दिला. संत भगवान बाबांनी पर्यायी गड निर्माण करून  शिक्षण आणि वसतिगृह सोयी, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सदाचार यासाठी ही कार्य केले. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांना आपला आदर्श मानताना म्हणतात,' जग बदल घालुनी घाव सांगूनी गेले मज भीमराव!' .

तुकोजी होळकर आणि मिस मिलर यांच्या विवाहमुळे  होळकर घराण्यात वाद निर्माण झाला होता त्यावेळी सर्वांना एकत्र करून 4 मार्च 1928 ला त्यांच्यात बाबासाहेबांनी समेट घडवून आणला होता. तसेच मातंग, चर्मकार जाती परिषदा घेवून त्यांच्या हक्क अधिकारांच्या लढाईचे नेतृत्व केले. ओबीसी ही ओळख 1928 ला सायमन कमिशन ला दिलेल्या मेमोरंडम मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. 1926 ला 'देशाचे दुष्मन' या पुस्तकाविरोधात कोर्टात लढण्यासाठी मा.जेधे, जवळकर या नेत्यांना बाबासाहेब कोर्टात युक्तिवाद करून केस जिंकून देतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानामध्ये देशातील सर्वात मोठा भाऊ ओबीसी साठी अगोदर तरतूद केली कलम 340 ने, त्यानंतर कलम 341 ने  अस्पृश्यासाठी  (अ. जा.  SC ) साठी ज्यात देशातील 1500 जातींना एकत्र करून अनुक्रम दिला आणि त्यानंतर अनुसूचित जमातीच्या बांधवासाठी कलम 342 ने प्रतिनिधित्वाच्या तरतुदी केल्या. सोबतच 5वी आणि 6वी अनुसूचीही ST साठी जोडली. बहुजननायक मान्यवर कांशीरामजी यांनी बाबासाहेबांचे कार्य आणि विचारधारा सामाजिक आणि राजकीय आंदोलनातून भारतभर घेवून जाण्याचा प्रयत्न केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जनतेला संदेश व आजची भरकटलेले अनुयायी:

18 मार्च 1956 ला आग्रा येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया !" असे विधान केले होते. कारण, शिकलेल्या लोक बेइमानी करून समाजाची लुबाडणूक करीत आहेत. स्वतः चे कुटुंब, घर यांचीच पोटे भरत आहे. समाजाला वेळ, बुद्धी, पैसा देत नाहीत. आजची नेते मंडळी व अनुयायी देखील बाबासाहेबांना मानते पन त्यांनी सांगितलेल्या संदेशाला मानत नाही.

बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात स्वीय सहायक नानकचंद रत्तु 31 जुलै, 1956 चा प्रसंग सांगतात की, बाबासाहेब अनेक रात्री पायात डोके घालून फुंदत व रडत असत. त्या दिवशी धाडस करून मी विचारले की, "बाबासाहेब तुम्ही रात्र रात्र झोपत नाहीत आणि असे का रडता?". त्यावेळी बाबासाहेब सांगतात, माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी केलेल्या धोकाधडीचे राजकारण आणि संघर्ष करून मिळविलेल्या हक्क अधिकार यासाठी पुढे नेणारे अनुयायी नसल्याचे दुःख यामुळे रडतो आहे! यातून आपण  तरी अंधभक्त न बनता बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी होऊया!

ज्या भारतीय संविधानामुळे प्रतिनिधित्व मिळाले, हक्क अधिकार मिळाले आणि देशात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित राष्ट्र निर्माण व्हावे व यासाठी "संविधान " टिकविणे, त्याचा संपूर्णपणे अंमल करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वामनदादा कर्डक म्हणत,

'भीमा तुझ्या मताचे जर पाच लोकं असते | तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते||

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता | वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते||

धम्म अनुयायांनी पंचशील याचे पालन करावे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. आज असे होते काय? तर नाही हे उत्तर येते! आज ज्यांच्यामुळे प्रतिनिधित्व, संधी मिळाली त्यांच्या संदेशाला विसरून त्याउलट वर्तन करीत आहेत. ज्या बाबासाहेबांनी परदेशात थंड वातावरणात मदिरा सहजपेय आहे, त्याठिकाणी आणि भारतात सुद्धा दारूच्या ग्लास ला स्पर्श केला नाही. कोणतेच व्यसन केले नाही. आताचे काही राजकीय पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी रात्रीच्या वेळी 'बार' वर बसून दिवसभरात बहूजन समाजासह कांबळे, येडे, म्हस्के, सोनवणे यांना कसं अडवून लुटलं याच्या गप्पा ग्लास ला ग्लास लावून जयभीम नावाचा 'चिअर्स' करून करत आहेत! कंदुऱ्या, जावळ, नवस-सायास, करतात. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन न करता तसेच बौद्ध धर्माचे आचरण न करता हिंदू धर्माचे आचरण करून अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढले त्या मनुवाद्यांच्या संघात नेते व कार्यकर्ते सामील होतात याचे आत्मचिंतन जनतेने करावे. अशाप्रकारे असाह्य व परावलंबी जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. अस्पृश्य उद्धारासाठी त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. अस्पृश्यांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेठवण्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणाऱ्या या महामानवाचे परिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झाले.

आजतागायत पददलितांचे रक्षणकर्ते, कैवारी व मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये होते. बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याचे पदोपदी स्मरण करून आपली समस्या ही राष्ट्रव्यापी आहे, म्हणून राष्ट्रव्यापी संघटनेत सतत संघटितपणे कार्यरत राहणे हाच एकमेव पर्याय आहे. निश्चितच आपण यापुढे आपला वेळ, बुद्धी, श्रम आणि पैसा देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेवू व भारतीय संविधानाचा जागर करत राहू व त्याचे संरक्षण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम!!

 


डॉ. राजेंद्र आनंदा लवटे 

विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग

राजे रामराव महाविद्यालय, जत

bryoraj@gmail.com 


 


 


 

 

  
 Blogger द्वारे प्रायोजित.