Header Ads

जतेत | पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा | प्रशासनाकडून सक्त आदेश असतानाही बाजारपेठत गर्दी |


जत,प्रतिनिधी : जत शहरात 4 दिवसाच्या शंभर टक्के लाॅकडाऊन नंतर आज पुन्हा मुख्य बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.नगरपरिषद,महसूल विभाग,आरोग्य विभाग पोलीस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवाचे रान करत आहेत.



दुसरीकडे प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील व्यापारी,ग्राहकांनी हरताल फासत सोशल डिस्टन्सिंगचा वाट लावली आहे.गर्दी करणारी चार दुकाने सील केल्यानंतरही परिस्थितीत बदल होत नसल्याचे वास्तव आहे.मंगळवार पेठ,भाजीपाला विक्री ठिकाणे पुन्हा गर्दी कायम होती.यामुळे शहरावर कोरोनाचे संकट कायम आहे.



  • कठोर कारवाई करणार

  • नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या आरोग्य सुस्थितीत रहावे,यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करत आहोत.धोका कायम आहे.सर्व व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग,मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याच्या सुचना दिल्या आहेत.आम्ही लॉकडाऊन होऊन नये यासाठी प्रयत्न करत आहोत.तरीही काही व्यापारी नियम पाळत नसल्याचे दिसत आहे.सर्वांनी आदेशाचे पालन करावे,अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील.

  • अभिजीत हराळे

  • मुख्याधिकारी,नगरपरिषद,जत

  •  


Blogger द्वारे प्रायोजित.