Header Ads

कोरोना : डफळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सँनिटायझर,साबण,मास्कचे वाटप


डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर गाव भागातील सुमारे 1 हजार कुंटुबियांना सँनिटायझर, मास्क,डेटॉल साबनचे वाटप करण्यात आले.


संरपच बालिकाकाकी चव्हाण यांच्याहस्ते या साहित्य वाटपाची सुरूवात करण्यात आली.गाव भागातील मुख्य बाजारपेठ,सर्व गल्ल्या,विस्तारित वसाहती मधिल सुमारे 1 हजार कुंटुबियांना हे साहित्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत व्हावी म्हणून वाटण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जात दोन डेटॉल साबण,100 मी सँनिटायझर, दोन मास्क असे साहित्य वाटप करण्यात येत आहे.प्रांरभी 1 हजार कुंटुबियांना हे साहित्य वाटण्यात येत आहे.कोरोनापासून बचावासाठी ग्रामपंचायतीकडून सर्व उपाय योजना करण्यात येत आहे. यापुढेही गावातील सर्व कुंटुबांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी सांगितले.

 

डफळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सँनिटायझर, साबन,मास्कचे वाटप करताना संरपच बालिकाकाकी चव्हाण,ग्रा.प.सदस्य व कर्मचारी

Blogger द्वारे प्रायोजित.