Header Ads

कोरोना | बंदमुळे काळ्याबाजारातील पेट्रोलचा दर दुप्पट


 जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी घोषित करण्यात आली. यामुळे पेट्रोल पंपावरही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल देणे बंद केले आहे. त्यांचाच फायदा गावागावात पेट्रोल विकणाऱ्या विक्रेत्यांनी घेतला आहे.मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवलेल्या पेट्रोलचा दर या महाभागांनी दीडशे रूपये लिटर केला असून पेट्रोल मिळत नसल्याने काही नागरिक नाईलाजाने काळ्या बाजाराने हे दुप्पट दराने पेट्रोल घेत आहेत.याकडे पोलीसांची डोळेझाक होत आहे.

 


Blogger द्वारे प्रायोजित.