बिंळूर,उमराणी परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा | बिंळूर,एंकूडी द्राक्षबाग भुईसपाट ; उमराणीत बेदाणा भिजला

 

 

उमराणी,वार्ताहर : बिंळूर,उमराणी एंकूडी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. द्राक्ष,बेदाणे,रब्बी पिकांसह घराचे मोठे नुकसान केले.बिंळूर येथील गुरूलिंगा घेज्जी यांची चार एकर तर एंकुडी येथील सिदगोंडा लक्ष्मण खलाटी यांची एक एकर द्राक्षबाग रवीवारी सायकांळी आलेल्या वादळी वाऱ्यात कोसळली.यात घेज्जी यांचे वीस लाख तर खलाटी यांचे पाच लाखाचे नुकसान झाले.उमराणी येथील राजू यळमळी,इराप्पा यळमळी,महादेव यळमळी,संगोडा यळमळी यांचा शेडवर टाकलेला प्रत्येकी पाच टन बेदाणा भिजल्याने मोठे नुकसान झाले.

रवीवारी सायकांळी एंकूडी परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडका बसला.त्यात बिंळूरचे शेतकरी गुरूलिंगा घेज्जी यांची द्राक्षांने भरलेल्या बागेत वादळी वारे घुसल्याने मंडपाच्या तारा व अंगल कोसळून बाग भुईसपाट झाली.यात त्याचे सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.

एकूंडीतील सिदगोंडा खलाटी विकण्यायोग्य आलेली द्राक्ष बागेच्या वादळी वाऱ्यांने तारा तुटल्याने बाग कोसळली.त्यात द्राक्षे,अँगल,ताराचे सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले आहे.

 

 

 

बिंळूर येथील पडलेली द्राक्षबाग,

उमराणी येथील बेदाणा शेडमधिल बेदाणा वादळी पावसात भिजला आहे.