बलात्कार प्रकरण ; संशयित शिक्षकाला १७ पर्यत पोलीस कोठडी

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सतीश अंकुश कांबळे या शिक्षकाला उमदी पोलिसांनी अटक केली असून त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने आज हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला शुक्रवारी दि. 17 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी आरोपी सतीश कांबळे याने अल्पवयीन पिडीत मुलीस दमदाटी करून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तो तेथून पळ काढला होता.रवीवारी रात्री उशिरा कांबळे याला उमदी पोलिसांनी अटक केली. आज सोमवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दि.17 एप्रिल रोजी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.