Header Ads

बाजमध्ये बेकायदा दारू अड्ड्यावर छापा | एक लाखाचा मुद्देमाल जप्त


जत,प्रतिनिधी : बाज ता.जत येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या नितीन दादासो गोरे वय 32,रा.बाज याला ताब्यात घेत 1 लाख 2 हजार 336 रूपये किंमतीच्या 355 बॉटल जप्त करण्यात आल्या.

उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी हि कारवाई केली.

अधिक माहिती अशी,बाज येथे बेकायदा देशी दारूचा साठा करून नितीन गोरे हा दारू विक्री करत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.त्याआधारे दुय्यम निरिक्षक संजय वाडेकर,जवान उमेश निकम,रणधीर पाटील,भरत सांवत,उदय पुजारी,स्वप्निल कांबळे यांच्या पथकाने छापा टाकला असता नितिन गोरे यांच्याकडे एक लाख दोन हजार 336 रूप़याचा मुद्देमाल आढळूंन आला.त्याला ताब्यात घेत माल जप्त करण्यात आला आहे.

 

 

बाज ता.जत येथे टाकलेल्या छाप्यात पकडलेल्या दारू विक्रेत्यासह मुद्देमाल व पथक
 


Blogger द्वारे प्रायोजित.