Header Ads

जमिनीच्या वादातून तरूणांचा खून | गळवेवाडी(गोधळेवाडी)येथील घटना : तिघे संशयित ताब्यात


संख,वार्ताहर : गोधळेवाडी ता.जत येथील जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी तरूण शेतकऱ्यांचा अखेर बुधवारी मुत्यू झाला.सुंशात खंडू गळवे (वय 19,रा.गळवेवस्ती,गोधळेवाडी)असे मुत्यू झालेल्या तरूण शेतकऱ्यांचे नाव आहे.मंगळवार (ता.31) रोजी घटनाघडली होती.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. डिवायएसपी दिलीप जगदाळे,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर घटनास्थळी पोहचले आहेत.म्हाळाप्पा गळवे,तुकाराम गळवे,पांडुरंग गळवे,एकनाळ गळवे,बिराप्पा गळवे सर्वजण रा.गोधळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.यातील म्हाळाप्पा गळवे,एकनाळ गळवे,बिराप्पा गळवे तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,तर तुकाराम गळवे,पांडुरंग गळवे फरारी झाले आहेत.


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,गोधळेवाडीतील गळवेवस्ती येथे खंडू गळवे व भाविकीत रस्त्यावरून वाद होता.यातून मंगळवारी सुंशात घरासमोर बसला असता संशयित पाच जणांनी त्याला काठीने मारहाण केली.भांडण सोडविण्यासाठी गेलेले खंडू लक्ष्मण गळवे यांनाही मारहाण करण्यात आली.मारहाणीत सुंशात गंभीर जखमी झाले होते.सांगलीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र उपचार सुरू असताना बुधवार ता.1 ला त्यांचा मुत्यु झाला.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही घडलेल्या या प्रकाराने गोधळेवाडीत खळबळ उडाली आहे.अधिक तपास उपनिरिक्षक नामदेव दांडगे करत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.