Header Ads

उमदी | विना मास्क फिरणाऱ्या तरूणांना शर्ट काढून तोंडाला बांधण्याची शिक्षा
 


उमदी,वार्ताहर : उमदी परिसरात विना मास्क फिरणाऱ्या तरूणांना पोलीसांनी लाठीच्या फटक्याने स्वागत केले.मास्क नसणाऱ्यांना शर्ट काढून बांधण्यास भाग पाडले.
कोरोना विषाणुचा फैलाव रोकण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत.गर्दी होऊ नये म्हणून जमाव बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय काही कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्याच्या सुचना आहेत.तरीही उमदी परिसरातील काही तरूण विना मास्क,विना कारण रस्त्यावरून फिरत आहेत.त्यांना पकडत उमदी पोलीसांनी त्यांची चांगलीच दखल घेतली.प्रांरभी फटके व नंतर शर्ट काढून तोंडास बांधण्याची शिक्षा दिली.

 

जत तालुक्यातील उमदी परिसरात फिरणाऱ्या तरूणांना शर्टाचा मास्क करण्यास पोलीसांनी भाग पाडले.


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.