Header Ads

कोरोना | ग्राम स्तरावरील कर्मचाऱ्यांना 25 लाखाचे विमा संरक्षण द्यावे ; जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग


जत,प्रतिनिधी : कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी  सांगली जिल्ह्यात सर्वात महत्वपूर्ण काम करत असलेले आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,मदतनिस,ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक,सदस्य,संरपच,यांना सोलापूर जिल्हा परिषेदेच्या धर्तीवर सांगली जिल्हा परिषदेने 25 लाख रूपयाचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी, अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे.


कोडग म्हणाले,ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर काम करणारे सर्व सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,आशा कार्यकर्ते व आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना लढाईत जीव धोक्यात काम करत आहेत.त्यांच्यासह त्यांच्या कुंटुबियांना मोठा धोका आहे.तरीही ते घटक देशसेवा बजावत आहेत.त्यांच्या सुरक्षेसाठी सांगली जिल्हा परिषद मार्फत 25 लाखाचा विमा उतरविण्यात यावा,आरोग्य सेवा बजविणा-या सर्व अधिकारी / कर्मचा-यांना सहकार्य करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे.ग्रामीण भागात गावस्तरावर संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे,असेही आवाहन संरपच कोडग यांनी केले.


Blogger द्वारे प्रायोजित.