वज्रवाडला गाराचा पाऊस,द्राक्ष घडाचे बागात अंतरून
बिंळूर : जत तालुक्यातील बिंळूर परिसरात रवीवारी सायकांळी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीने पाऊसाने द्राक्ष बागाचे कोट्यावधीने नुकसान केले.सायकांळी चार वाजलेल्यापासून सुरू झालेल्या या वादळी पावसात गारांचा तडाखा बसला.त्यामुळे विकण्या योग्य द्राक्ष बागातील घडाचा बागेत सडा पडला होता.बिंळूर,उमराणी,गुगवाड,एंकूडी,उमराणी,खोजानवाडी,देवनाळ परिसरातील द्राक्ष बागायतदाराचे या वादळी पावसाने तोंडचे पाणी पळविले आहे. सिदगोंडा लक्ष्मण खलाटी एंकूडी 1एकर ,भिमाण्णा ईराप्पा हलकट्टी,वज्रवाड 1 एकर,प्रकाश सिदगोंडा बिरादार वज्रवाड, रकमाजी पांडुरंग बामणे,वज्रवाड,प्रकाश विठ्ठल म्हेत्रे सरपंच, वज्रवाड,राजेंद्र शिवानंद व्हनखंडे,वज्रवाड या शेतकऱ्यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
वज्रवाड परिसरात गाराचा तडाक्याने द्राक्ष बागाचे झालेले नुकसान