जत | बसस्थानकात शिवभोजन थाळी योजना सुरू

 

जत (वार्ताहर) - गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुनदेण्यासाठी शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी जत बसस्थानक आगाराच्या एस.टी.कँटिग येथे सुरु करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला असून याचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या झालेल्या परिस्थितीमुळे शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत या ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. केवळ पाच रुपयात ही थाळी जूनपर्यंत मिळणार असून, कारोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब जनता, स्थलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, बेघर इत्यादी नागरीकांच्या हालआपेष्टा होऊ नये, यासाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला

आहे.